‘मिस्टर इंडिया 2’ वरून आणखी एक ‘वाद’, रणवीरच्या ‘या’ डायलॉगमुळे रिलीज नाही होणार ‘टीझर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नुकुतीच अली अब्बास जफर यांनी 1987 साली आलेल्या मिस्टर इंडिया या आयकॉनिक सिनेमाचा सेकंड पार्ट बनवणार असल्याची घोषणा केली होती. मिस्टर इंडियाचा टीजर येण्याची तारीखही फायनल झाली होती. परंतु काही कारणानं रिलीज झाला नाही. एका इंग्रजी वृत्तानुसार, रणवीर सिंगला घेऊन सिनेमाचा टीजर शुट केला होता. हा टीजर 26 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार होता. टीजरमध्ये रणवीर सिंग फेमस डायलॉग मोगॅम्बो खुश हुआ म्हणताना दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोनी कपूर यांनी या स्पिन ऑफच्या निगेटीवचे राईट्स झी ला विकले आहेत. जेव्हा त्यांना टीजरची माहिती मिळाली तेव्हा निर्मात्यांना याला काही काळासाठी होल्डवर टाकण्याची मागणी केली.

अलीकडेच अली अब्बास जफर यांनी ट्विटरवर सिनेमाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हणाले होते की, “मी या सिनेमासाठी झीचा पार्टनर बनण्यासाठी खूप उत्सुक आहे. असा आयकॉनिक सिनेमा पुन्हा पडद्यावर आणणं खूप मोठी जबाबदारी आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं. सध्या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत आहे. अद्याप सिनेमासाठी कोणताही अभिनेता फायनल झालेला नाही. एकदा स्क्रिप्ट फायनल झाली की, त्यानंतर कास्टींग सुरू केली जाईल.

टीजरमध्ये रणवीर सिंग फेमस डायलॉग मोगॅम्बो खुश हुआ म्हणताना दिसणार आहे. परंतु सिनेमाच्या टीमला ज्या पद्धतीनं हा डायलॉग हवा आहे त्या पद्धतीनं येताना दिसत नाही. यामुळेच आता टीजरला उशीर होत आहे. अमरिश पुरीनं ज्या पद्धतीनं हा डायलॉग बोलला होता ज्या इमेजला तोडणं खूप कठिण होत आहे.