YouTuber कॅरी मिनाटीची बॉलिवूडमध्ये जोरदार एन्ट्री ! Big B अमिताभ सोबत झळकणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   व्हायरल व्हिडीओंमुळं चर्चेत राहणारा प्रसिद्ध YouTuber कॅरी मिनाटी (Carry Minati) म्हणजेच अजय नागर (Ajay Nagar) लवकरच मोठ्या पडद्यावर डेब्यू करणार आहे. खास बात अशी की, कॅरी बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत काम करू शकतो.

कॅरी मिनाटी, बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) याच्या मेडे (Mayday) या आगामी सिनेमातून डेब्यू करणार आहे. या सिनेमात बिग बी अमिताभ आणि बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) प्रमुख भूमिकेत आहेत.

एका वृत्तपत्रासोबत बोलताना कॅरीनं सांगितलं की, माझा बिजनेस हेड दीपिक चार याला कुमार मंगत पाठक कडून कॉल आला आहे. ते अजय देगवणच्या प्रॉडक्शन कंपनीसोबत जोडलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की, मी लवकरच त्यांच्या सोबत दिसणार आहे.

अजय नागरनं सांगितलं की, माझा हेतू लोकांचं मनोरंजन करणं आहे. सध्या मी त्या दिशेला जाण्याचा विचार करत नाहीये. मी या सिनेमाचा हिस्सा होणं यासाठी स्विकार केलं कारण मला यात एका प्रकारे माझंच कॅरेक्टर साकारायचं आहे. माझ्यासाठी हे खूप सोपं असेल. यात माझा लहान रोलं आहे.