धर्माच्या नावावर बॉलिवूड सोडणारी अभिनेत्री जायरा वसीमवर युजर्सचा ‘संताप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘दंगल’ चित्रपटामधून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जायरा वसीमने आता बॉलिवूड सोडले आहे. धर्माच्या नावाखाली चित्रपटापासून दूर गेलेल्या या अभिनेत्रीच्या एका घोषणेने लोकांना चकित केले होते. आत्ता पुन्हा ती चर्चेमध्ये आली आहे. यावेळी तिचा एक फोटो सोशल मीडियावरील युजर्सच्या निशाणावर आहे.

प्रियंका चोप्राने ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत प्रियांका, जायरा, फरहान अख्तर आणि रोहित सरफ एकत्र दिसत आहेत. हे चौघेही समुद्रकिनार्‍यावर आहेत. अशामध्ये जायरा तिच्या मिडल लूकसाठी आणि या जुन्या फोटोमुळे युजर्सच्या निशाणावर आली आहे.

जायराच्या या फोटोमुळे अनेक युजर्सने तिला कमेंट केल्या आहे. एक युजरने कमेंट केली की, ‘जायराने तर धर्माच्या नावाखाली बॉलिवूड सोडले आहे तेव्हा ती यांच्यासोबत काय करती आहे? जेव्हा तिने यापूर्वी धर्माच्या नावाखाली बॉलिवूड सोडले आहे. ही किती ड्रामेबाज मुलगी आहे’. दुसऱ्या युजरने कमेंट केली की, ‘ही ती मुलगी आहे जिने आपल्या धर्मामुळे अभिनय सोडला आहे. मग आता काय? पुन्हा लाइम लाइटमध्ये येण्यासाठी ड्रामा केला होता का? अशा वेगवेगळ्या कमेंट युजर्स जायरा करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like