अ‍भिनेता अभय देओलच्या ‘त्या’ आरोपांवर फरहान अख्तरनं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. अनेकांनी आपापले अनुभवन शेअर केले आहेत बॉलिवूड स्टार अभय देओल यानंही त्याचा अनुभव सांगितला होता. आहे. इंडस्ट्रीच्या विरोधात त्यानं आपलं म्हणणं मांडलं होतं. अवॉर्ड्सनं हृतिकला लिड आणि मला सपोर्टींग अॅक्टर बनवलं असं तो म्हणाला होता. यानंतर आता जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमातील त्याचा कोस्टार फरहान अख्तर यानं यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला फरहान अख्तर ?

एका मुलाखतीत बोलताना फरहान म्हणाला, “मला एवढंच म्हणायचं आहे की, तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जबाबदारीनं आणि मेहनतीनं काम करायला हवं. किती मासिकांनी तुम्हाला कवर केलं, किती मासिकाच्या फ्रंटवर तुम्ही आलात, किती वर्तमानपत्राच्या फ्रंटवर तुम्ही आलात हे जर तुमचं ध्येय असेल तर मला असं वाटतं की, तुम्ही चुकीच्या प्रोफेशनमध्ये आलात. तुम्ही या सगळ्यासाठी इथं नाही आहात. तुम्ही इथं अॅक्टर, डायरेक्टर, सिंगर, म्युझिक कंपोजर हे बनण्यासाठी आलात की रिअॅलिटी स्टार ?” असा सवालही यावेळी फरहाननं केला.

काय म्हणाला होता अभय देओल ?

अभयनं त्याच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये अभय म्हणतो, “जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनिनेमा 2011 साली रिलीज झाला होता. आजकाल मी याच सिनेमाचं नाव माझ्यासाठी जपत असतो. मी जेव्हा खूप चिंतीत किंवा तणावात असतो तेव्हा हा सिनेमा पहात असतो. मला हा उल्लेख करायचा आहे की, सर्व अवॉर्ड फंक्शननं मला आणि फरहानला मेन लिड्सनं डिमोट केलं आहे. आम्हाला सपोर्टींग अॅक्टर म्हणून नॉमिनेट करण्यात आलं.”

अभय पुढे म्हणाला, “हृतिक आणि कॅटरीनाला अॅक्टर्स इन ए लिडींग रोल च्या रुपात नॉमिनेट करण्यात आलं होतं. फिल्म इंडस्ट्रीतील तर्कानुसार हा एक माणूस आणि एक महिला प्रेमात पडणाऱ्या कपल्सची स्टोरी होती. असेच गुप्त आणि ओपन मार्ग आहेकत ज्यांनी लोक इंडस्ट्रीत तुमच्या विरोधात कारस्थान करतात. या प्रकरणी ही इंडस्ट्री बशर्म होती. मी या अवॉर्ड्सचा बहिष्कार केला. परंतु फरहानला यापासून काही अडचण नाहीये.”