सत्संग सुरु असताना निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला ; ३ ठार, १० जखमी

अमृतसर : वृत्तसंस्था – अमृतसरच्या राजासांसी गावात निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. दोन दुचाकी स्वारांनी हा हल्ला घडवून आणला असून त्यात तीनजण ठार झाले आहेत. तर १० जण जखमी झाले असल्याचं वृत्त आहे. जखमींपैकी काही जणांचा प्रकृती चिंताजनक आहे. या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण पंजाब हादरून गेलं असून पंजाबसह दिल्लीत अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. राजासांसी परिसरात रविवारी दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी ग्रेनेड फेकून घडवून आणला.

येथील निरंकारी भवनामध्ये दर रविवारी सत्संगाचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे आजही येथे सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने बॉम्ब फेकला. त्यामुळे झालेल्या स्फोटात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी गोंधळ माजला. तसेच धावपळ सुरू झाली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. राजासांसी गावातील निरंकारी भवनात झालेल्या या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून, दहा जण जखमी झाले आहेत अशी अधिकृत माहिती, आयजी (सरहद्द) सुरिंदर सिंह परमार यांनी दिली.

अमेरिकेत आणखी एका भारतीयाची गोळ्या घालून हत्या