एसजीएस समोर बॉम्बच्या अफवेने खळबळ 

पुणे : पोलीसनामा ऑनलाई – लष्कर परिसरातील एसजीएस मॉलमध्ये सोमवारी दुपारी दोन मिठाईच्या बॉक्समध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने पोलिसांची एकच धावपळ उडाली. बॉम्बशोधक पथकाने तेथे जाऊन पाहणी केल्यावर मात्र बॉक्समध्ये जेवण ठेवलेले होते. त्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निश्‍वास सोडला.

बीडीडीएस पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एसजीएस मॉलसमोर मोकळ्या जागेत दोन बेवारस बॉक्स आढळून आला. रिक्षाचालकाने हा बॉक्स पाहिला. त्यानंतर रिक्षाचालकाने ही बाब पोलिसांच्या  व मॉलच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर परिसरात व पोलिस दलात एकच खळबळ उडाली.

नियंत्रण कक्षातून याची माहिती बीडीडीएस पथकाला 12 वाजून 5 मिनिटांनी दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक महादेव तोदले, पोलिस उपनिरीक्षक  नरेंद्र बैसाने, कर्मचारी प्रशांत शिंदे, सोदागर माने, पवन घोरपडे, बाळासाहेब लोखंडे, नारायण पेहरेकर यांचे पथक सुर्या या श्‍वानाला घेऊन दाखल झाले. त्यानंतर श्‍वानाने पाहणी केली.

तसेच पथकाकडील यंत्रसामुग्रीद्वारे त्या बॉक्सची पाहणी करण्यात आली. मात्र एक्सरे केल्यानंतर त्यात बॉक्ससदृश्य काही आढळून बॉक्समध्ये पोलिसांना जेवण आढळून आले. त्यानंतर पोलिसांनीही सुटकेचा निश्‍वास सोडला. तर गर्दीचे ठिकाण असल्याने डीआरडीओने दिलेल्या दक्ष रोबोचा वापर करण्यात आला नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले