बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देताना भीषण स्फोट ! 30 दहशतवादी ठार

काबूल : वृत्तसंस्था – अफगाणिस्तानमधील एका मशिदीत बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेत असलेल्या तालिबानी दहशतवाद्यांना हा वर्ग खूप महागात पडला आहे. या प्रशिक्षणादरम्यान स्फोट होऊन 30 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानच्या लष्करानं याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, या प्रशिक्षणादरम्यान 6 परदेशी दहशतवाद्यांसह एकूण 30 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.

जे दहशतवादी स्फोटात ठार झाले ते भूसुरूंग तयार करण्यातले तज्ज्ञ होते आणि शनिवारी ते 26 अन्य दहशतवाद्याना बॉम्ब तयार करण्याचं लाईव्ह प्रशिक्षण देत होते. बाल्फ प्रांतातील दौलताबाद जिल्ह्यातील कुल्ताक गावात हा स्फोट झाला. या स्फोटात ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही असंही अफगाण लष्करानं एक पत्रक प्रसिद्ध करून सांगितलं आहे.

खम्मा प्रेसच्या एका रिपोर्टनुसार सदर तालिबानी दहशतवादी एका मशिदीत जमले होते. तिथं त्यांना बॉम्ब आणि आयईडी तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं.