अंबाला एअरफोर्स स्टेशन बॉम्बनं उडवण्याची धमकी, समोर आलं ‘जासून मोनिका’चं पत्र

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हरियाणाच्या अंबाला एअरफोर्स स्टेशनवर (जिथे राफेल तैनात आहेत) बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकीच पत्र अंबाला एअरफोर्स स्टेशनच्या अधिकार्‍यांना मिळाले. याची पुष्टी हरियाणा डीजेपीने केली आहे. ते म्हणाले की, 15, 17, 21, 25 आणि 29 ऑगस्ट रोजी 12 स्फोटे घडवू त्या आधी दिल्ली, त्यानंतर अयोध्या आणि नंतर अंबाला एअरफोर्स स्टेशन आणि अखेर पंजाब उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली होती.

याबाबत स्पष्टीकरण देताना अंबाला डीएसपी राम कुमार म्हणाले की, काल एयरफोर्सच्या अथॉरिटीकडून भारतातील अनेक शहरांवर बॉम्बहल्ला करण्याची धमकीचे पत्र मिळाल्याची तक्रार मिळाली आणि आम्ही तपास सुरू केला आहे. यापूर्वी अशी पत्रे बर्‍याच वेळा आली आहेत, याक्षणीही पोलिस याविषयी पूर्णपणे गंभीर आहेत.

या पत्रात म्हटले आहे की, या षडयंत्रात ’15 लोक सामील आहेत, ज्यांचे मुख्य सूत्रधार जालंधर राममंडी निवासी राजेश वैश्य हा असल्याच पत्रात नमूद केल आहे या पत्रात दिलेला मोबाइल नंबर बंद आहे. आणि 25 कोटी रुपये पाकिस्तानातून आले असल्याचे पत्रात लिहिले आहे तसेच या पत्रात स्वत:ला डिटेक्टिव्ह मोनिका म्हणून ओळख सागितलं आहे. पत्रात लिहिलेले आहे की दुसरा दहशतवादी शुभम आहे. तो बिलासपूरचा आहे. याकडे कपड्यांचे दुकान असून मोबाइल नंबरही आहे. ते सर्व मिळाले आहेत. इतर लोकांबद्दल माहिती मिळाल्यास ते ती तुमच्याकडे पाठवेल.

पत्राच्या आधारे गुप्तचर यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. पत्रात असेही लिहिले आहे की, ‘मी हे पत्र सीआरपीएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ यांना पाठवित आहे, कारण काही मोठे पोलिस अधिकारीही यात सामील आहेत. त्यांनी मला पकडले होते पण मी तेथून पळून गेले, यावेळी मला खूप दुखापत झाली, म्हणून मी उलट्या हाताने लिहित आहे. मी माझ्या देशाला वाचवण्यासाठी स्वत: चा जीव ही देऊ शकते. प्लीज सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही त्या सर्वांना पकडावे, नाहीतर ते बॉम्ब लावतील, जय हिंद सर, जय भारत. ‘