कोलकातामध्ये मंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ फेकला बॉम्ब, 6 लोकांना अटक

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाइन –  पश्चिम बंगालच्या एका मंत्र्यांच्या कोलकाता येथील निवासस्थानावर मोटर सायकलवरून आलेल्या काही गुन्हेगारांनी गावठी बॉम्ब फेकल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात सहा लोकांना अटक केली आहे.

पोलिसांनुसार, बुधवारी रात्री कस्बा परिसरात राज्याचे माहिती आणि सांस्कृतिक राज्यमंत्री इंद्रनील सेन यांच्या घराच्या जवळ बॉम्ब फेकल्याची घटना घडली. यामध्ये कुणीही जखमी झालेले नाही. ही घटना घडली तेव्ह सेन आपल्या घरात नव्हते.

कोलकाताच्या पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, या प्रकरणात कथित संबधातून सहा लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकी आणि देशी बॉम्बचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतल्यानंतर या लोकांचा शोध लागला. आरोपींची चौकशी केली जात आहे.