कळंबोली शाळेजवळ बॉम्ब ठेवल्याप्रकरणी पुण्यातील कोंढव्यातून एकाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कळंबोली येथील शाळेजवळ बॉम्ब ठेवल्याप्रकरणी पुण्यातील कोंढवा येथून एकाला अटक करण्यात आली आहे. तर बाकी दोन आरोपींना पनवेल येथून अटक करण्यात आली. कमी तीव्रतेचे स्फोट घडवून, धनिक लोकांना घाबरवून पैसे उकळण्यासाठी हा प्रकार केल्याचे तपासात उघड झाले असल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सुशील साठे (वय-३५ रा. एनडीए गेट जवळ कोंढवा धावडी, पुणे), मनिष लक्ष्मण भगत (वय-४५ रा. उलवे, नवी मुंबई), दिपक नारायण दांडेकर (वय-५५ रा. कोंबडभुजे, उलवे ता. पनवेल, नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्याचा मुख्यसुत्रधार दिपक दांडेकर हा आहे.

कळंबोली सेक्टर १ येथील सुधागड एज्युकेशनच्या शाळेबाहेरील रस्त्यावर बॉम्ब आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. हातगाडीवर ठेवलेल्या खोक्यामध्ये घड्याळाला वायरी जोडून त्या दुसऱ्या बॉम्बला जोडलेल्या होत्या. याची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथकाने त्या ठिकाणी जाऊन या वस्तू वेगवेगळ्या केल्या.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एक टोपी घातलेला व्यक्ती ती हातगाडी त्या ठिकाणी ठेवत असल्याचे दिसून आले. या व्यक्तीने आपण सीसीटीव्हीमध्ये दिसणार नाही याची काळजी घेतली होती. मात्र, पोलिसांनी कसून तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला.

आणखी एक बॉम्ब जप्त

या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार दीपक दांडेकर हा असून त्याचे वडीलांचा दगड खाणीचा व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे त्याला बॉम्ब बनवण्याची माहिती होती. साठे आणि दांडेकर यांच्यावर मोठे कर्ज असल्याने त्यांनी धनीक लोकांना घाबरवून पैसे लुटण्याचा प्रयत्न होता. कळंबोली येथे ठेवलेल्या बॉम्बव्यतिरिक्त आणखी एक बनवून ठेवलेला बॉम्ब पोलिसांनी जप्त केला आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?