Coronavirus : नामवंत शेफ आणि बॉम्बे कॅन्टीनचे सह संस्थापक फ्लॉयड कार्डोज यांचा ‘कोरोना’ व्हायरसने मृत्यु

न्यूयॉर्क : पोलीसनामा ऑनलाइन – नामवंत शेफ आणि बॉम्बे कॅटिंगचे सह संस्थापक फ्लॉयड कार्डोज यांचा कोरोना व्हायरसमुळे न्यूयॉर्क येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यु झाला. त्यांच्या नातेवाईकांनी ही माहिती दिली. फ्लॉयड कार्डोज हे 59 वर्षांचे होते. ते कोरोना विषाणूचे बाधित होते. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होता. कार्डोज हे मुंबईतील लोकप्रिय साखळी रेस्टॉरेंट असलेल्या बॉम्बे कॅटिंग आणि ‘ओ पेड्रो’चे सह संस्थापक होते. काही काळापूर्वीच त्यांनी तिसरी कंपनी ‘बॉम्बे स्वीट’ची सुरुवात केली होती.

मुंबईत जन्म झालेले कार्डोज हे 8 मार्चपर्यंत मुंबईतच होते. त्यानंतर ते न्यूयॉर्कला गेले होते. ताप आल्याने आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची त्यांनी 18 मार्चला सोशल मिडियाद्वारे माहिती दिली होती.  त्यावेळी केलेल्या तपासणीत त्यांनी चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यामागे आई बेरिल, पत्नी बरखा आणि दोन मुले जस्टिस आणि पीटर असा परिवार आहे.