Bombay High Court | २ मुलांच्या विधवा आईसोबत रहिवाशी भागात वारंवार रेप झाला, हे मान्य करणे कठीण – मुंबई हायकोर्टाने फेटाळली केस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाने एका व्यक्तीविरुद्धचा बलात्काराचा एफआयआर आणि आरोपपत्र रद्द करताना म्हटले आहे की, दाट लोकवस्तीच्या परिसरात दोन मुलांच्या विधवा आईवर अनेक वेळा जबरदस्तीने बलात्कार करण्यात आला, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. या प्रकरणातील आरोपी महिलेने केलेली तक्रार आणि आरोपपत्र रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली होती. महिलेच्या पतीचा १८ मार्च २०१७ रोजी मृत्यू झाला आहे आणि आरोप आहे की, त्याच वर्षी १३ जुलै रोजी ती आपल्या मुलांसोबत असताना आरोपी पाणी पिण्याच्या बहाण्याने तिच्या घरी आला आणि आरोपीने चाकू दाखवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

 

त्याने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने तिच्याकडे पैशांची मागणी केल्याचेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. मात्र, पीडितेने नकार दिल्यावर आरोपीने तिचे दागिने घेतले आणि आपण ते दागिने एका ज्वेलर्सकडे गहाण ठेवणार असल्याचे सांगितले. शिवाय, एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, पीडितेवर अनेकदा बलात्कार करण्यात आला आणि तिला मारहाणही करण्यात आली. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला की एफआयआर उशीराने करण्यात आला, तो खोटा आणि निराधार आरोपांनी भरलेला आहे. त्यांनी सांगितले की, ही महिला विधवा असून दोन मुलांसह दाट लोकवस्तीच्या परिसरात राहते.

 

ते म्हणाले की, पीडिता आणि आरोपी एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. त्यांनी असाही युक्तीवाद केला की, ज्वेलर्सच्या जबाबावरून असे दिसून येते की, तिच्या सांगण्यावरून दागिने गहाण ठेवण्यात आले. तसेच तिच्या पालकांच्या विधानावरून असे दिसून आले की त्यांना कथित घटनांबद्दल माहिती नव्हती आणि ती स्वतः कधीही त्यांना भेटायला गेली नाही किंवा त्यांना भेटायला येण्याची परवानगी दिली.

अतिरिक्त सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की पीडितेवर चाकूचा धाक दाखवून अनेक वेळा बलात्कार करण्यात आला आणि तिचे दागिने जबरदस्तीने काढून घेण्यात आले. पीडितेने धाडस दाखवत एफआयआर दाखल केला आहे आणि आरोपीविरुद्ध पुरेसे साहित्य आहे. पीडितेच्या वकिलांनी युक्तिवाद केला की तिच्यावर अनेक वेळा बलात्कार झाला आणि अर्जदाराने तिला आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, तपास संपला असून आरोपपत्र दाखल झाले आहे, त्यामुळे अर्जदाराने खटल्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. (Bombay High Court)

 

औरंगाबाद खंडपीठाला दिसून आले की, सहा महिन्यांनंतर पीडितेने एफआयआर दाखल केला आहे.
जबाबावरून दिसून आले आहे की, अर्जदार नियमितपणे तिच्या घरी येत असे.
असेही आढळून आले की, तिने तिचे एटीएम कार्डही आरोपीला दिले होते.
त्यामुळे यावर विश्वास ठेवण्यास जागा आहे की, तिचा नवरा जिवंत असतानाही पुरुष आणि विधवेचे दीर्घकालीन संबंध होते.
कोर्टाने असेही म्हटले की ज्वेलर्सच्या जबाबावरून असे दिसून येते की तो आरोपी आणि
पीडितेला ओळखत होता आणि तिने स्वतः दागिने गहाण ठेवले होते.

 

न्यायालयाने म्हटले की, महिलेच्या आई-वडिलांनीही पोलिसांना जबाब दिला आहे
की, त्यांची मुलगी वेगळी राहत होती आणि ती त्यांना भेटायला गेली नाही किंवा त्यांना आपल्या घरी येऊ दिले
नाही आणि अशाप्रकारे ते कोणत्याही घटनेबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते.
खंडपीठाने म्हटले की, हे मान्य करणे कठीण आहे की, दाट लोकवस्तीच्या परिसरात विधवेवर बलात्कार झाला.

 

Web Title :- Bombay High Court | aurangabad bombay high court dismissed case said repeated rape in residential area difficult to accept

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shamna Kasim | आलिया भट्टनंतर आता ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तीन महिन्यातच दिली गुड न्यूज

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चांगलीच खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे ते ट्वीट

Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल