Bombay High Court | रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात आरोपी बनवणार की नाही? उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला ‘खडा’ सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांना मुंबई पोलीस आरोपी करणार आहे का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) राज्य सरकारला (Maharashtra Government) केला आहे. अन्यथा ही याचिका उगाच ऐकत बसून कोर्टाचा वेळ वाया घालवू नका अशी नाराजी व्यक्त करत याबाबत सोमवारपर्यंत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई हाय कोर्टाने (Bombay High Court) दिले आहेत. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि त्याबाबतचा गोपनीय अहवाल लिक करणं यासंबंधी मार्चमध्ये फौजदारी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

फोन टॅपिंग प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेमुळे रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती नितीन जामदार (Justice Nitin Jamdar) आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल (Justice Sarang Kotwal) यांच्या खंडपीठापुढे (bench) सुनावणी झाली. आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासाचा अहवाल सोमवारी होणाऱ्या पुढील सुनावणीत कोर्टात दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

 

मुंबई पोलिसांनी अद्याप आरोपी केले नाही

मुंबई पोलिसांनी या प्रकरणात अद्याप रश्मी शुक्ला यांना आरोपी (Accused) केलेले नाही.
परंतु सध्या तपास सुरु आहे असं आपल्या प्रतिज्ञापत्रात पोलिसांनी म्हटले आहे,
अशी माहिती विशेष सरकारी वकील दरायस खंबाटा (Special Public Prosecutor Darayas Khambata) यांनी हायकोर्टाला दिली.
जर शुक्ला यांना आरोपी केले नसेल आणि त्यांना पोलीस आरोपी करणार नसतील तर याचिकेवर सुनावणी घेऊन वेळ वाया घालवणार नाही,
असं न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे जेव्हा त्यांना आरोपी केलं जाईल तेव्हा त्या पुन्हा न्यायालयात याचिका करु शकतात असेही स्पष्ट केलं.

Web Title :-  Bombay High Court | bombay hc asks mumbai police whether it will be adding IPS rashmi shukla as accused in illegal phone tapping and leaking of documents case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp | 1 नोव्हेंबरपूर्वी करा ‘हे’ महत्वाचे काम, अन्यथा फोनमध्ये वापरू शकणार नाही व्हॉट्सअ‍ॅप; जाणून घ्या

IRCTC Rupay SBI Card | फ्रीमध्ये मिळावा ट्रेन तिकिट, रेल्वे लाऊंज अ‍ॅक्सेसची सुविधा, जाणून घ्या सर्व फीचर्स

7th Pay Commission | खुशखबर ! मोदी सरकारकडून सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट; DA 3% नी वाढवला