मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तर मुंबई हाय कोर्टाने (Bombay High Court) कंगनाला चांगलंच धारेवर धरल्याचे पहायला मिळत आहे. मुंबई हाय कोर्टाने बुधवारी (दि.8) कंगनाने दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या तक्रारीनंतर कंगनाने ही केस रद्द करण्याची मागणी 1 सप्टेंबर रोजी केली होती. त्यानंतर आता हाय कोर्टाने (Bombay High Court) ही याचिका फेटाळली आहे.
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणानंतर कंगना फारच चर्चेत आली होती. बॉलिवूडसह (Bollywood) अनेकांवर तिने आरोप केले होते. तर जावेद अख्तर यांच्यावरही तिने आरोप केले होते. त्यानंतर अख्तर यांनी कोर्टात धाव घेतली. अख्तर यांनी कंगनावर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ओढून त्यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप एका मुलाखतीत केला होता.
तर कंगनाने तिच्या याचिकेत म्हटले की, Section 482 CrPC अंतर्गत तिच्यावर लावण्यात आलेले आरोप रद्द करावेत, अशी मागणी तिने याचिकेत केली होती. कंगनाचे वकील रिझवान सिद्धीकी (Lawyer Rizwan Siddiqui) यांनी ही याचिका दाखल केली होती.
कंगनाने नाव बदललं
कंगना सध्या तिच्या ‘थलायवी’ (Thalayavi) चित्रपटामुळे चर्चेत आली आहेत.
लवकरच तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
त्याच जोरदार प्रमोशन सुरु आहे.
एवढच नाही त कांगनाने सोशल मीडियावर तिचं नाव देखील बदललं आहे. ज्यात तिनं कंगना थलायवी असं लिहिलं आहे.
Pune | मनोहर मामा आणि त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करा – मअनिस