Bombay High Court | ‘…तुमच्याविरोधात कारवाई का करु नये?’ उच्च न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (NCB) संचालक समीर वानखेडेंच्या (Sameer Wankhede) कुटुंबाने दाखल केलेल्या मानहानी प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अवमान करावाई का करु नये अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना केली आहे. एकलपीठाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द केल्यानंतर नव्याने सुनावणी सुरु आहे.

 

नबाव मलिक यांनी वानखेडे कुटुंबाविरोधात कोणतेही आरोप करणार नसल्याची हमी दिलेली असतानाही आरोप करत असल्याने कोर्टाने ही विचारणा केली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नवाब मलिक यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले असून यावर शुक्रवारी (दि.10) पुढील सुनावणी होणार आहे.

 

समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानहानीच्या दाव्यात अंतरिम दिलासा देण्यास नकार देणारा एकलपीठाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द केला होता. नवाब मलिक यांनी एकलपीठाच्या न्यायमूर्तींचा निर्णय सहमतीने रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांची मागणी खंडपीठाने मान्य केली होती. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडेंच्या (Dnyandev Wankhade) दाव्यावर नव्याने सुनावणी सुरु आहे.

नव्याने प्रकरण ऐकून निर्णय देईपर्यंत आपल्याकडून वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतंही वक्तव्य केलं जाणार नाही अशी हमी नवाब मलिक यांनी दिली होती. परंतु कोर्टामध्ये हमी दिलेली असतानाही मलिक आमच्याविरोधात आरोप करत आहेत, असं वानखेडे यांच्या वतीने सांगण्यात आलं. त्यावेळी त्यांनी नवाब मलिक यांनी दिलेल्या काही मुलाखतींचा संदर्भ दिला.

 

मलिक यांनी यावेळी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून ही वक्तव्य केल्याचा युक्तीवाद केला.
दरम्यान, कोर्टाने मलिकांनी कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा निष्कर्ष नोंदवला तसंच
आम्ही कारवाईचा आदेश देण्यापूर्वी तुम्हीच कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी अवमान कारवाई का करु नये हे सांगावे अशी विचारणा केली.
तसेच नवाब मलिक यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे.

 

Web Title :- Bombay High Court | bombay high court ncp minister nawab malik ncb sameer wankhede

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rakesh Jhunjhunwala | चांगली कमाई करून देऊ शकतो राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोतील रू. 250 चा ‘हा’ स्टॉक!

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1087 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणात लातूरच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, शिक्षकांसह 5 जणांना अटक; आतापर्यंत 11 जणांना अटक