Bombay High Court | आरोप करण्याआधी शहानिशा केली होती का? ‘समीर वानखेडेंच्या विरोधात बोलण्यास बंदी घालता येणार नाही, पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) व त्यांच्या कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांविरोधात ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मलिक यांना ‘आरोप करण्याआधी शहानिशा केली होती का?’ असा सवाल केला. तसेच याबाबत प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

 

मलिकांचे निराधार आरोप

 

नवाब मलिक हे आमच्या कुटुंबीयांवर निराधार आरोप करत आहेत. त्यामुळं आमची प्रतिमा मलीन झाली आहे.
सोशल मीडियात आमच्या कुटुंबाद्दल आक्षेपार्ह (Offensive) प्रतिक्रिया येत आहेत.
आम्हाला धमक्या (Threat) दिल्या जात असल्याचा आरोप करत ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात सव्वा कोटींचा दावा दाखल केला आहे.
त्यांच्या याचिकेवर दिवाळी सुट्टीकालीन कोर्टाचे न्यायमूर्ती माधव जामदार (Justice Madhav Jamdar) यांच्या खंडपीठापुढं सुनावणी झाली.
त्यावेळी न्यायालयाने (Bomदोन्ही पक्षकारांना आपापली बाजू स्पष्ट करण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

काय म्हटले न्यायालयाने?

 

नवाब मलिक हे एका राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते आणि जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनी जे काही ट्विट केले.
त्याविषयीच्या कादपत्रांची सत्यता आधी तपासून घेतली होती का? कारण सरकारी सेवक असलेल्या समीर वानखेडे यांच्याविषयी ते व्यक्तिगत काही बोलत
असतील तर ते त्यांचे वडील म्हणून ज्ञानदेव वानखेडे यांच्यावर परिणाम करणारे ठरु शकतात.

 

समीर वानखेडे हे सरकारी सेवक असल्यानं त्यांच्याविरोधात बोलता येणार नाही अशी बंदी घालण्याचा आदेश आम्ही देऊ शकत नाही.
परंतु, इतर सर्व गोष्टींविषयी बोलताना मलिक यांनी कागदपत्रांची सत्यता आधी तपासली होती का, हे कोर्टाला पहायचं आहे, असं खंडपीठाने नमूद केले.
समीर वानखेडे यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात अनेक ट्विट करताना ज्या कागदपत्रांचा तुम्ही आधार घेतला.
त्यांच्या सतत्येविषयी खातरजमा करुन तुम्ही त्यांचा वापर केला, असं सांगणारं प्रतिज्ञापत्र शुक्रवारपर्यंत दाखल करा, असे निर्देश न्यायालयाने (Bombay High Court) मलिक यांना दिले आहेत.

 

वानखेडेंना देखील निर्देश

 

नवाब मलिक यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देताना न्यायालयाने ज्ञानदेव वानखेडे यांनाही निर्देश दिले आहेत.
नवाब मलिक यांनी केलेले ट्विट खोटे असतील तर तसे स्पष्ट करणारं अतिरिक्त प्रतिज्ञापत्र शुक्रवारपर्यंत दाखल करा, अशा सूचना न्यायालयाने वानखेडे यांना दिल्या आहेत.

 

Web Title : Bombay High Court | bombay high court on dnyandev wankhede plea directs nawab malik file affidavit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या परराज्यातील दोघांना गुन्हे शाखेकडून अटक; एक लाखाचा मुद्देमाल जप्त

CM Uddhav Thackeray | ‘या’ कारणांसाठी CM उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होणार; 2-3 दिवस तिथेच राहून उपचार घेणार

Gold Price Today | सोन्याचे दर वाढले, चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचे नवीन दर