Bombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला नकार देणे बलात्कार नाही – मुंबई हायकोर्ट

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Bombay High Court | प्रेयसीसोबत मोठ्या कालावधीपर्यत संबंध ठेवून जर एखाद्या प्रियकराने ऐनवेळी लग्नाला नकार दिला तर त्यास बलात्कार म्हणता येणार नाही. हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) सुनावला आहे.

 

कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले की, पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारावर आणि साक्षीदार सादर केले आहेत त्यांच्या आधारावर हे सिद्ध होते की आरोपीने जरी नंतर लग्नाचा विचार बदलला असेल, परंतु अगोदर आरोपीचा हेतू महिलेसोबत लग्न करण्याचा होता. या कारणामुळे आरोपीवर बलात्काराचे प्रकरण लागू होत नाही. हे मत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench of Mumbai High Court) व्यक्त केले आहे.

 

30 वर्षीय महिलेने आरोपीविरूद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यात असे म्हटले होते की, आरोपीने लग्नाचे आश्वासन दिले होते आणि या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्या दोघांमध्ये शारीरीक संबंध प्रस्तापित झाले. दोन्ही कुटुंबाची आपसात चर्चासुद्धा झाली होती.

 

त्यावेळी सुद्धा आरोपी लग्नाला तयार होता. आरोपीने म्हटले होते की कोविडकाळ गेल्यानंतर तो लग्न करेल. परंतु आता तो लग्नाला नकार देत आहे. या तक्रारीविरूद्ध कोर्टात याचिका दाखल करून आरोपीने युक्तिवाद केला की त्याचे महिलेसोबत सहमतीने शारीरीक संबंध झाले होते.
यामुळे त्याच्यावर बलात्काराची केस होऊ शकत नाही. न्यायालयाने आरोपीचा युक्तिवाद स्वीकारला.

 

कोर्टाने या प्रकरणात काय म्हटले?

न्यायमूर्ती सुनील देशमुख आणि न्यायमूर्ती नितिन सूर्यवंशी यांच्या खंडपीठाने प्रकरणाच्या सुनावणीनंतर आपल्या निर्णयात म्हटले की,
जेव्हा दोन्ही कुटुंबांची भेट झाली तेव्हा आरोपीने सहमती दाखवली होती.
जे दोघांमध्ये शारीरीक संबंध झाले होते ते एकमेकांवर प्रेम असल्याने आणि आपसातील सहमतीने झाले होते.

नंतर प्रियकराचे मन बदलले आणि त्यास आता लग्नात रस नाही.
यावरून स्पष्ट होते की, आरोपी अगोदर लग्नाला तयार होता.
म्हणजे ज्यावेळी शारीरीक संबंध झाले त्यावेळी लग्नाचा हेतू होता.
अशावेळी आता जेव्हा तो लग्नासाठी तयार नाही,
त्याचा अर्थ हा नाही की अगोदर जे शारीरीक संबंध झाले, त्यास बलात्कार मानले जावे.

Web Title :-  Bombay High Court | bombay high court says after long affair refusal for marriage can not be considered as rape

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा