Homeताज्या बातम्याBombay High Court | 'जोपर्यंत वडील जिवंत आहेत, तोपर्यंत मुलीला मालमत्तेत हिस्सा...

Bombay High Court | ‘जोपर्यंत वडील जिवंत आहेत, तोपर्यंत मुलीला मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही’ – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वृद्ध माता-पित्यांना त्यांच्या मुलांकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची अनेक प्रकरणे आपल्याला आसपास पाहायला मिळतात. काही प्रकरणात थेट न्यायालयात दाद मागितली जाते. मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) नुकताच अशा एका प्रकरणाचा निवडा दिला असून एका वृद्ध पित्याच्या बाजूने निकाल दिला आहे. आपल्याच मुलीकडून छळ होत असल्याची याचिका वृद्ध पित्यानं न्यायालयात दाखल केली होती. वडिलांच्या फ्लॅटवर बेकायदेशीर (Illegal) ताबा मिळवून बसलेल्या मुलीला न्यायालयाने तातडीने मालमत्ता (property) खाली करण्याचे आदेश दिले आहे. मात्र मुंबईत अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) चिंता व्यक्त केली आहे.

 

मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) न्यायमूर्ती गौतम पटेल (Justice Gautam Patel) आणि न्यायमूर्ती माधव जामदार (Justice Madhav Jamdar) यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळनी न्यायालयाने म्हटले की, हा आमचा अनुभव आहे की या शहरात आणि विशेषत: श्रीमंत वर्गामध्ये वृद्ध मातापित्यांना त्यांच्या उतारवयात त्यांच्याच मुलांकडून त्रास आणि छळ (parents being harassed by children) सहन करावा लागतो.

 

आमच्यासमोर अशी अनेक प्रकरणे येत आहेत ज्यामध्ये वृद्ध माता-पित्यांना (elderly parents) त्यांच्याच मुलांकडून छळ सहन करावा लागत आहेत. प्रत्येक प्रकरणामध्ये आपल्या वृद्ध माता-पित्यांची संपत्ती मिळवण्याचा मुलांकडून प्रयत्न होत असल्याचे दिसून आलं आहे. तसेच असं करताना मुलांकडून आपल्या पालकांच्या वार्धक्यामध्ये त्यांच्या आयुष्याविषयी कोणताही विचार केला जात नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

 

काय आहे प्रकरण?

न्यायालयासमोर सुनावणी सुरु असलेल्या प्रकरणात मुलगी 2015 पर्यंत जर्मनीमध्ये राहत होती.
त्यानंतर ती भारतात परतली. तिच्या वडिलांचा दक्षिण मुंबईच्या अल्टामाउंट रोडवर (Altamount Road South Mumbai) आलिशान भागात फ्लॅट आहे.
त्या ठिकाणी ती आपल्या पित्यासोबत राहू लागली. मुलगी काही दिवसांनी परत निघून जाईल असे वडिलांना वाटले.
परंतु तसे न होता त्यांच्यात वाद सुरु झाले. हे वाद एवढे टोकाला गेले की,
मुलीने फ्लॅटमधील आपला हिस्सा घेतल्याशिवाय जाणार नसल्याचे वडिलांना धमकावलं.

 

वडील जिवंत असताना कसला हिस्सा?
मुलीच्या या मागणीवर न्यायालयाने तिला चांगलचं सुनावलं.
वडील जिवंत असताना कसला हिस्सा? उलट वडील त्यांची पूर्ण संपत्ती दुसऱ्या कुणालाही देऊन टाकू शकतात.
तो त्यांचा अधिकार आहे. मुलगी त्यांना असं करण्यापासून रोखू शकत नाही. जोपर्यंत वडील जिवंत आहेत,
तोपर्यंत मुलीला त्यांच्या मालमत्तेत कोणालाही हिस्सा मिळणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केलं.

 

Web Title :- Bombay High Court | bombay high court says wealthy parents being harassed by children for property

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol Price | केजरीवाल सरकारकडून दिल्लीकरांना मोठा दिलासा ! पेट्रोल 8 रूपयांनी स्वस्त, महाराष्ट्रात ठाकरे सरकारकडून अद्याप निर्णय नाही

Pune Crime | हिंजवडीतील एकाने लावला Flipkart आणि ‘डिलिव्हरी डॉट कॉम’ला सव्वा लाखांचा चुना; ‘मोडस” पाहून पोलीस ‘अवाक’

7th Pay Commission | न्यायाधीशांसंबंधी विधेयक LS मध्ये सादर, जाणून घ्या – ‘कधी मिळेल फॅमिली पेन्शनचा हा अधिकार’

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News