मुंबई उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना सूचना, म्हणाले – ‘पुण्यासारख्या ठिकाणी लॉकडाऊन करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुण्यासह ज्या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणी लॉकडाउन लावण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. अन्य जिल्ह्याची तुलना करता पुण्यामधील कोरोनाची परिस्थिती अजूनही गंभीर स्वरूपाची असल्याने त्या ठिकाणी मागच्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा अशा सूचना देत आम्हाला आदेश द्यायला लावू नका असे देखील उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

 

 

 

महाराष्ट्रातील आज कोरोना परिस्थितीचा आढावा मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. यावेळी अनेक जिल्ह्याच्या बाबतीत चर्चा केली गेली. पुण्यामध्ये अ‍ॅक्टिव्ह केसेस १.४ लाख आहेत. आतापर्यंत राज्यात पुण्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे.

इतर ठिकाणांहून पुण्यात लोक उपचारांसाठी येत असल्याने ही संख्या अधिक असल्याचे सरकारने सांगितलं. तर यावर न्यायालयाने यावेळी पुण्यातील संख्या चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे, तसेच, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे यांनी यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेत समान कार्यक्रम आखला पाहिजे असे मत न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

 

 

 

पणे महापालिकेचे वकील कुलकर्णी यांनी बोलताना म्हटले की, यावेळी मुंबईत चांगल्या पायाभूत सुविधा असल्याचं सांगितलं. दरम्यान पुण्यातील स्थितीवर बोलताना कोर्टाने तुमचे पालिका आयुक्त मुंबई पालिका आयुक्तांशी का बोलत नाहीत? त्यावर कोर्टाने म्हटलं, तुमच्याकडे अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या दुप्पट आहे. तुमच्याकडील पायाभूत सुविधा मुंबईसारख्या चांगल्या नसतील. मात्र, काहीतरी केलं पाहिजे, असे कोर्टाने यावेळी खडसावलं आहे.’ तसेच, मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला पाहिजे सांगत जर मुंबई मॉडेलंच सर्वोच्च न्यायालयाने कोर्टाने कौतुक केलं असेल तर अन्य पालिकांनीही हे मॉडेल स्वीकारलं पाहिजे असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.