home page top 1

बलात्कार प्रकरण : तुरुंगात असलेल्या अभिनेता करण ओबेरॉयला जामीन मंजूर ; पिडितेनेच रचला स्वत:वरील हल्याचा ‘कट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अभिनेता आणि गायक करण ओबेरॉय याचा जामीन मंजूर होऊ नये, यासाठी बलात्कार पिडितेनेच स्वत:वर हल्ला झाल्याचा कट रचल्याची माहिती सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली. याबाबत पोलिसांनी केलेल्या तपासाचा आधार घेऊन उच्च न्यायालयाने करण ओबेरॉय याचा जामीन अर्ज मंजूर केला.

एका महिला ज्योतिषाने करण विरोधात बलात्काराची फिर्याद दिल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी त्याला ५ मे रोजी अटक केली होती. करण याने विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला तसेच तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली होती. सत्र न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळल्याने त्याने उच्च न्यायालयात अपिल केले होते.

शुक्रवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी तक्रारदारावर झालेल्या हल्ल्याची माहिती न्यायालयाला दिली. तक्रारदाराने स्वत:वरच हल्ला करण्याचा कट रचला आणि अंमलात आणला. हा हल्ला आरोपीने केल्याचा आरडाओरडा केला.

यावेळी करणच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, तक्रारदार महिलेने केलेले सर्व आरोप खोटे असून एकमेकांच्या सहमतीनेच त्यांच्यात शारीरिक संबंध होते. तक्रारदाराशी नाते तोडल्यानंतरच तिने बलात्काराचा आरोप करण्यास सुरुवात केली. हे सर्व विचारात घेऊन न्यायमूर्ती रेवती मोहिते -डेरे यांनी करण ओबेरॉयचा ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

तक्रारदार आणि ओबेरॉय यांच्यात झालेल्या संदेशाच्या देवाणघेवाणीवरुन हेच लक्षात येते की, तक्रारदाराने स्वत:हून आरोपीसाठी गिफ्ट विकत घेतले. त्याने गिफ्टची मागणी केलीच नाही़ तसेच तक्रारदाराने स्वत:वरच हल्ला करुन असे दाखविण्याचा प्रयत्न केला की, तिने आरोपीविरोधात तक्रार केल्यामुळे तिला लक्ष्य केले जात आहे. आरोपीची जामिनावर सुटका होऊ नये, यासाठी तिने स्वत:वरच हल्ला केला, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

Loading...
You might also like