Bombay High Court | मशिदींवरच्या भोंग्यावरुन हायकोर्टानं मुंबई पोलिसांना फटकारलं, दिले ‘हे’ आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मशिदीवरच्या लाऊडस्पिकरवरुन मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) फटकारलं आहे. मशिदीवर (Mosques) लावलेल्य लाऊडस्पिकरमुळे (Loudspeaker) होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात (Noise Pollution) कारवाई न करणे हा न्यायालयाचा अवमान आहे, असं निरिक्षण मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) नोंदवले आहे. याबाबत कोर्टाने झोन 12 चे पोलीस उपायुक्तांना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
कांदिवलीमधील (Kandivali) लक्ष्मीनगर भागातील गौसिया मशिदीच्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या प्रदुषणाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) सुनावणी झाली. कांदिवलीतील रहिवासी असलेल्या रिना रिचर्ड (Rina Richard) यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1662102275517747200?s=20
ध्वनी प्रदुषणाबाबत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे कडक निर्देश हायकोर्टाने
पोलिसांना दिले आहेत. तक्रार करुनदेखील पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
यावर पुढील सुनावणी 29 मे पर्यंत तहकूब केली आहे.
दरम्यांन, मागील वर्षी मशिदीवर लावण्यात आलेल्या भोंग्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे
(MNS Chief Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मशिदींवरचे
भोंगे काढले नाही तर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावू, असा इशारा त्यांनी दिला होता.
यावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले होते.
Web Title : Bombay High Court high court slams mumbai police over loud speaker on mosque
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा