Bombay High Court | नव्या ‘आयटी’ नियमांसंबंधी मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आयटी कायद्यातील (IT Act) नव्या तरतुदींना सरसकट स्थिगिती देण्यास मुंबई उच्च न्यायलयाने (Bombay High Court) नकार दिला आहे. आयटी कायद्यातील दुरुस्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल करण्यात आली होती. नव्या तरतुदीमुळे माध्यमांची गळचेपी होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. नव्या कायद्यातील नियम हे अस्पष्ट, जुलमी आणि प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर व नागरिकांच्या व्यक्त होण्याच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारे असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.

नव्या आयटी कायद्यातील (new IT Act) डिजिटल मीडियाच्या (digital media) नैतिकतेशी संबंधित नियम 9 सह त्याच्या उपनियमांना उच्च न्यायालयाची स्थगिती दिली असून हा नियम अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दुसरीकडे कन्टेन्ट ब्लॉक (Content block) करण्याचे अधिकार देणाऱ्या नियमाला मात्र स्थगिती नाही. तर केंद्र सरकारला (Central Government) तीन आठवड्यात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आयटी कायद्यात प्रसिद्धीमाध्यमांबाबतचे नियम अस्तित्वात असताना दुरुस्तीद्वारे नवे नियम आणण्याची आवश्यकता काय ? विचार करण्याचे स्वातंत्र्य नसेल तर कोणी व्यक्त केसे होईल, एखाद्याच्या विचार करण्यावर तुम्ही बंधने कशी काय घालू शकता, अशी प्रश्नांची सरबत्ती उच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला केली होती. तसेच नव्या नियमांबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

कायद्याने प्रसारमाध्यमांना दिलेले संरक्षण नव्या नियमांच्या माध्यमातून काढून टाकण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यावर ही गंभीर बाब असून कायद्याने दिलेले संरक्षण कसे काढून घेतले जाऊ शकते, अशी विचारणा देखील कोर्टाने सरकारला केली आहे.

Web Title :-  Bombay High Court | it rules 9 stayed by mumbai high court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Delivery Scam on WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू झालंय डिलिव्हरी ‘स्कॅम’, एक चूक अन् रिकामं होईल बँक अकाऊंट; जाणून घ्या

MP Dr. Amol Kolhe | डॉ. अमोल कोल्हेंनी केला कट्टर विरोधक आढळराव पाटलांना फोन, म्हणाले… (व्हिडीओ)

Facebook Friend | लग्नाचा प्रस्ताव फेटाळला तर फेसबुक फ्रेंडने ‘गावभर’ लावली तरूणीची पोस्टर्स, गुन्हा दाखल