Bombay High Court | ‘महिलेच्या गुप्तांगामध्ये लिंगाऐवजी बोटांचा वापर करणे हा देखील बलात्कारच’ – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  एखाद्या महिलेवर अत्याचार करताना तिच्या गुप्तांगामध्ये बोटांचा वापर करणं हा बलात्कारच (Rape) आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नोंदवले आहे. एका गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी याचिकाकर्त्या आरोपीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) कायम ठेवली आहे. आरोपीला बलात्कार आणि अपहरण (Kidnapping) प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण

मुंबईतील मलाड (Mumbai-Malad) येथे राहणाऱ्या एका 33 वर्षीय आरोपीवर 21 वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित आणि आरोपी हे एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. आरोपीने गतिमंद मुलीला जत्रेच्या निमित्ताने फिरायला नेले. जत्रेत नेल्यावर त्याने जवळ असलेल्या एका निर्जन स्थळी मुलीला घेऊन गेला. त्याने मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (physical relation) ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडित मुलगी रडू लागल्याने आरोपीने घाबरून तिला घरी सोडले. दरम्यान, पीडित मुलीच्या घरचे तिला शोधत होते.

कुटुंबाकडून पोलिसांत तक्रार

पीडित तरुणीने घरी गेल्यावर तिच्यासोबत घडलेला प्रसंग घरातील लोकांना सांगितला.
त्यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात बलात्काराची तक्रार केली.
या चाललेल्या खटल्यामध्ये आरोपीला बलात्कार आणि अपहरण केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती.
सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात आरोपीनं मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतली. यावर नुकतीच न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे (Justice Revati Mohite-Dhere) यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

बलात्काराचा आरोप काढावा, आरोपीची मागणी

आरोपीने त्याला झालेल्या शिक्षेविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.
या याचिकेत आरोपीने आपल्यावर लावण्यात आलेला बलात्काराचा आरोप काढून टाकावा.
त्या ऐवजी अत्याचाराचा आरोप करावा अशी मागणी केली होती.
बलात्काराच्या व्याख्येनुसार लिंगाचा योनीत जबरदस्तीनं प्रवेश होणं अपेक्षित असतं.
परंतु इथे आरोपीनं केवळ बोटांचा वापर केला आहे.
त्यामुळे हे प्रकरण लैंगिक आत्याचार म्हणून चालवण्यात यावं, अशी मागणी आरोपीने याचिकेतून केली होती.

लिंगाऐवजी बोटांचा वापर हा देखील बलात्कार

लिंगाऐवजी बोटांचा वापर हा देखील बलात्कारच असल्याचं यावेळी हायकोर्टानं स्पष्ट केलं.
तसेच या प्रकरणात जरी लिंग आणि योनीचा संबंध आलेला नसला तरीही पीडितेच्या अंतर्गत अवयवांना जखमा झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे.
तसेच पीडित मुलीवर अत्याचार झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी जे न्यायवैद्यकीय पुरावे जमा केले आहेत, ते आरोपीशी तंतोतंत जुळत आहेत.
त्यामुळे बलात्कारचा आरोप रद्द करता येणार नाही, असं हायकोर्टाने स्पष्ट करत आरोपीला दिलासा देण्यास नकार दिला.
तसेच आरोपीची याचिका फेटाळून लावली.

Web Title : bombay high court refused to grant any relief to accused in mumbai malad rape case

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Narayangaon Bypass | पुणेकरांसह नाशिककरांसाठी खुशखबर ! नारायणगाव बायपासचं काम पूर्ण; पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवास होणार वेगवान

DGP Sanjay Pandey | कामात हयगय केली तर केवळ 10 % पगार कट; राज्याच्या पोलीस महासंचालकांचे आदेश

Sachin Pilot | गेल्या 6 महिन्यात पेट्रोलच्या किंमती 66 वेळा वाढल्या, काँग्रेसचा भाजपवर निशाणा