Bombay High Court | कायदेशीरदृष्ट्या पहिला विवाह समाप्त केल्याशिवाय दुसर्या पत्नीला पतीच्या पेन्शनचा हक्क नाही, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) बुधवारी म्हटले की, दुसर्या पत्नीला आपल्या मृत पतीची पेन्शन (Pension) घेण्याचा अधिकार नाही. हा निर्णय अशा प्रकरणांमध्ये लागू होईल जिथे दुसरा विवाह (Second Marriage), पहिल्या विवाहातून कायदेशीर फारकत न घेताच झाला आहे. न्यायमूर्ती एस. जे. कथावाला (Justice S. J. Kathawala) आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव (Justice Milind Jadhav) यांच्या खंडपीठाने सोलापुर (Solapur) येथील रहिवाशी शामल ताटे (Shamal Tate) यांची ती याचिका फेटाळली (Mumbai High Court), ज्यामध्ये राज्य सरकारद्वारे (State Government) त्यांना पेन्शन लाभ देण्यास नकार देण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले (Bombay High Court) होते.
महादेव यांनी पहिला विवाह समाप्त न करता केला दुसरा विवाह
उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) आदेशानुसार, शामल यांचे पती महादेव सोलापुर जिल्हा कलेक्टर कार्यालयात (Solapur District Collector’s Office) शिपाई होते आणि त्यांचा मृत्यू 1996 मध्ये झाला होता. महादेव यांनी अगोदरच एका अन्य महिलेसोबत विवाह केला होता, जेव्हा त्यांनी दुसरीसोबत विवाह केला. त्यांच्या मृत्यूनंतर शामल ताटे आणि महादेव यांच्या पहिल्या पत्नीमध्ये एक तडजोड झाली की पहिल्या पत्नीला मृताच्या सेवानिवृत्ती लाभातील जवळपास 90 टक्के रक्कम मिळेल, तर दुसर्या पत्नीला मासिक पेन्शन (Monthly Pension) मिळेल.
मात्र, महादेव यांच्या पहिल्या पत्नीचा कॅन्सरने मृत्यू झाल्यानंतर शामल यांनी राज्य सरकारला पत्र लिहून मागणी केली की,
तिला महादेव यांच्या पेन्शनची थकित रक्कम मिळावी.
राज्य सरकारने भरपूर विचार केल्यानंतर 2007 ते 2014 च्या दरम्यान शामल यांचे चार अर्ज फेटाळले.
—
शामल यांनी तेव्हा 2019 मध्ये हायकोर्टमध्ये धाव घेतली आणि दावा केला की त्या महादेव यांच्या तीन मुलांची आई असल्याने आणि समाज त्यांना पती आणि पत्नी म्हणून ओळखत असल्याने,
त्या पेन्शन मिळवण्यासाठी पात्र आहेत. विशेषता पहिल्या पत्नीच्या नंतर, जी पेन्शन घेत होती आणि मरण पावली आहे.
मात्र, न्यायालयाने म्हटले की, सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयाने हे स्थापीत केले आहे की,
दुसर्या विवाहाला हिंदू विवाह कायद्यांतर्गत (Hindu Marriage Act) शून्य मानले पाहिजे,
जर हा विवाह पहिला विवाह कायदेशीरदृष्ट्या समाप्त न करता झाला असेल.
खंडपीठाने म्हटले की, राज्य सरकारचे हे म्हणणे योग्य आहे की, केवळ कायदेशीरदृष्ट्या विवाहित पत्नीलाच कौटुंबिक पेन्शनचा (Family Pension) अधिकार आहे.
Web Title :- Bombay High Court | second wife not entitled to deceased husband s pension if first marriage not legally dissolved bombay hc
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update