Bombay High Court | ‘रात्री महिलेच्या खाटेवर बसून तिच्या पायांना स्पर्श करणे म्हणजे विनयभंगच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महिलेच्या विनयभंग प्रकरणी (Molestation Case) जालना जिल्ह्यातील (Jalna district) परमेश्वर ढगे (Parmeshwar Dhage) याला कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षाच्या सश्रम कारावासाची (Imprisonment) शिक्षा सुनावली आहे. त्या निर्णयाविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad bench) अपील केले असून त्याची सुनावणी न्यायमूर्ती मुकुंद सेवलीकर (Justice Mukund Sevalikar) यांच्यासमोर झाली. यावेळी मध्यरात्री एखाद्या महिलेच्या खाटेवर बसून तिच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तिचा विनयभंगच आहे, असे महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले.

 

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, परमेश्वर ढगे हा जुलै 2014 मध्ये सायंकाळी पीडीतेच्या घरी गेला होता. तेथे गेल्यानंतर पीडितेकडे तिच्या पतीची चौकशी केली. तो बाहेर गेला असून आज रात्री येणार नसल्याचे पीडितेने ढगेला सांगितले होते. त्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ढगे पुन्हा पीडित महिलेच्या घरी गेला. त्यावेळी पीडिता झोपली होती. त्याने घराचा दरवाजा उघडून तो तिच्या खाटेवर जाऊन बसला आणि त्याने तिच्या पायाला स्पर्श केला. दरम्यान, ढगेने आपला पीडितेचा विनयभंग करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सांगत बचाव करण्याचा प्रयत्न केला. (Bombay High Court)

यावर न्यायमूर्ती सेवलीकर म्हणाले, रेकॉर्डवरील नोंदीनुसार ढगे याचे कृत्य हे महिलेच्या विनयशीलतेला धक्का पोहोचवणारे होते.
रात्रीच्यावेळी पीडितेच्या घरी जाण्याचे अन्य कोणतेही कारण नव्हते.
तसेच घरी गेल्यावर पीडितेच्या खाटेवर बसून तिच्या पायाला स्पर्श करणे हे त्याचे वर्तन लैंगिक (Sexual) हेतून होते.
शिवाय एवढच्या रात्री पीडितेच्या घरी जाण्यामागील कारणाचे स्पष्टीकरण समाधानकारक पणे देऊ शकला नाही.
शिवाय, रात्रीच्या वेळी एखाद्या महिलेच्या शरीराच्या कोणत्याही भागाला तिच्या संमतीशिवाय स्पर्श करणे म्हणजे तिचा विनयभंग करणे होय.
त्यामुळे ढगे याने लैंगिक हेतूने शेजारील महिलेच्या घरी जाऊन तिचा विनयभंग केला आहे.
कनिष्ठ न्यायालयाने (lower court) ढगेला दोषी ठरवण्यात कोणतीही चूक केली नाही असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.

 

Web Title :- Bombay High Court | sitting on the cot of a woman at midnight would amount to outraging her modesty said bombay high court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shani Dev | 2022 मध्ये अडीच वर्षानंतर ’शनी’ बदलणार ‘रास’, जाणून घ्या कुणाला सुरू होईल ‘अडीचकी’ आणि ‘साडेसाती’

Bathroom Stroke | हिवाळ्यात येणाऱ्या बाथरूम स्ट्रोकबद्दल तुम्हाला माहिती आहे?, जाणून घ्या कशी घ्यावी खबरदारी

Pune Crime | पुणे ग्रामीणची मोठी कारवाई ! यवत पोलिसांकडून पाटस परिसरात 50 लाखांच्या गांजासह 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक