Bombay High Court | मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी आनंद परांजपेंना हायकोर्टाचा दिलासा, पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे (NCP Leader Anand Paranjape) यांच्यावर गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) परांजपे यांना दिलासा दिला आहे. परांजपे यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यामध्ये तुर्तास अटक करणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) दिली आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील चार विविध पोलीस ठाण्यात यासंदर्भात दाखल असलेले गुन्हे एकत्र करुन ते रद्द करण्यासाठी आनंद परांजपे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे (Justice Revathi Mohite-Dere) आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण (Justice Prithviraj Chavan) यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

पोलिसांनी भूमिका स्पष्ट करावी

आनंद परांजपे यांच्या वतीने अ‍ॅड. सुहास ओक (Adv. Suhas Oak) यांनी मुंबई हायकोर्टाला (Bombay High Court) सांगितले की, हे सर्व गुन्हे निव्वळ राजकीय हेतूनं दाखल केले आहेत. सर्व प्रकरणातील तक्रारदार हे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. याची नोंद घेत हे अशी प्रकरण फार काळ ताटकाळत ठेवता येणार नाहीत, असं स्पष्ट करत कोर्टाने 18 जानेवारी पर्य़ंत ठाणे पोलिसांना (Thane Police) भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलिसांना ध्यानात राहत का नाही?

पोलिसांनी गुन्हा दाखल करताना काळजी घेतली पाहिजे. यात सर्वसामान्य जनतेचा पैसा आणि वेळ वाया जातोय,
याचे भान राखायला हवं. एकाच प्रकरणात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करता येत नाहीत,
कायद्यानं त्यापैकी एकच गुन्हा दखलपात्र राहतो ही गोष्ट पोलिसांच्या ध्यानात का राहत नाही? असा सवाल उपस्थित करत अशा पोलीस अधिकाऱ्यांना आर्थिक दंड करुन ही रक्कम त्यांच्या पगारातून वगळायला पाहिजे, तर असे प्रकार थांबतील असं हाय कोर्टाने म्हटले.

नेमकं काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते.
यानंतर शिदे गटाने आक्रमक भूमिका घेत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले.
आयपीसी कलम 153, 501, 504 नुसार परांजपे यांच्याविरुद्ध कल्याणमधील बाजारपेठ आणि कोळसेवाडी
तर डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
चार स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्याने परांजपे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.

Web Title :- Bombay High Court | thane ncp leader anand paranjpe at bombay mumbai high court to quash fir against him for defaming cm eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Unauthorized School | ‘त्या’ शाळांवर गुन्हा दाखल करा, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

Pune Crime News | 50 लाखांच्या खंडणीसाठी मुंबईतील 3 बिल्डरचे पुण्यातून अपहरण, गुन्हे शाखेकडून काही तासात सुटका; तिघांना ठोकल्या बेड्या

Gauri Khan | गौरी खान तिच्या लूकमुळे होते वायरल; चाहते करत आहेत कौतुक