Bombay High Court | अल्पवयीन मुलीच्या गालाला स्पर्श करणं लैंगिक अत्याचार नाही, हाय कोर्टाकडून आरोपीची सुटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – अल्पवयीन मुलीच्या गालाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीला मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) जामीन दिला आहे. पॉस्को कायद्यांतर्गत (POSCO Act) लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीच्या गालाला स्पर्श करणं लैंगिक अत्याचार नाही असं यावेळी मुंबई हाय कोर्टाने (Bombay High Court) सांगितलं. जुलै 2020 पासून या व्यक्तीला कोठडीत ठेवण्यात आलं होतं. न्यायमूर्ती के शिंदे (Justice K. Shinde) यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

माझ्या मते पॉक्सो कायद्यातील कलम 7 अंतर्गत कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय गालाला हात लावणं लैंगिक अत्याचार (Sexual harassment) नाही, असं न्यायमूर्ती के शिंदे यांनी सांगितलं. संबंधित 46 वर्षीय व्यक्तीवर आठ वर्षाच्या मुलीच्या गालांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप होता. मुलीच्या आईने ठाण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पॉक्सोमधील कलम 7 अंतर्गत कोणीही लैंगिक हेतूने अल्पवयीन मुलाच्या किंवा मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श केलं किंवा अल्पवयीनाला आपल्या गुप्तांगाला स्पर्श करण्यास भाग पाडणं किंवा लैंगिक हेतूने शारिरीक संपर्क होईल अशी कोणतीही गोष्ट केल्यास तो लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे. कोर्टाने सुनावणीदरम्यान, हाती आलेल्या पुराव्यानुसार प्राथमिक दृष्ट्या आरोपीने कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय पीडित मुलीच्या गालाला स्पर्श केल्याचं दिसत आहे असं सांगितलं.

आरोपीच्या वकिलांनी व्यावसायातील शत्रुत्वामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला.
तपास पूर्ण झाला असून चार्जशीट दाखल झाल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.
दरम्यान कोर्टाने जामीन देताना मांडण्यात आलेल्या मताचा दुसऱ्या प्रकरणांच्या खटल्यांवर होऊ नये असे स्पष्ट केलं आहे.

Web Title : bombay high court touching cheeks of minor without physical intent not sexual assault

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update