‘BMC नं सूडाच्या भावनेतून तोडलं कंगना रणौतचं ऑफिस; द्यावी लागणार नुकसानभरपाई’ : मुंबई उच्च न्यायालय

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) च्या मुंबईमधील ऑफिसात 9 सप्टेंबर रोजी बीएमसीनं तोडफोड केली होती. यावर आता मुंबई हायकोर्टानं (HIGH COURT OF BOMBAY) निर्णय दिला आहे. कोर्टानं म्हटलं आहे की, बीएमसने ही अ‍ॅक्शन सूडाच्या भावनेतून घेतली आहे. या तोडफोडीसाठी आता बीएमसीनं नुकसानभरपाई द्यायची आहे, असंही कोर्टानं सांगितलं आहे. हायकोर्टानं कंगनाच्या ऑफिसच्या नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आता मार्च 2021 पर्यंत अधिकारी त्यांचे रिपोर्ट्स कोर्टाकडे सोपवणार आहेत.

जस्टिस एसजे कैथवाला आणि आरआय छागला यांच्या खंडपीठानं या प्रकरणावर निर्णय देताना सांगितलं की, ज्या प्रकारे ही तोडफोड केली गेली आहे ते अनधिकृत होतं. हे चुकीच्या हेतून केलं गेलं होतं. याचिकाकर्त्यास कायदेशीर मदत घेण्यापासून रोखण्याचा हा प्रयत्न होता. कोर्टानं बेकायदेशीर बांधकामाची बीएमसीची नोटीसही रद्द केली आहे.

कंगना रणौतच्या मुंबईमधील ऑफिसची 9 सप्टेंबर रोजी बीएमसीनं तोडफोड केली होती. हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचं सांगितलं होतं. यानंतर कंगनानं कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. यानंतर कोर्टानं बीएमसीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर स्थगिती आणली होती.

You might also like