मुंबई HC ची ठाकरे सरकारला सूचना, म्हणाले – ‘अदर पुनावालांना देशात सुरक्षित वाटत नसेल तर तुम्ही त्यांना आश्वस्थ करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुक्तिसाठी सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला (adar poonawalla) यांनी देशाला लस उपलब्ध करून देत एक प्रकारे सेवा केली आहे. जर त्यांना देशात असुरक्षित वाटत असेल तर राज्य सरकारने त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आश्वस्थ करावे, अशा स्पष्ट सुचना मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला दिल्या आहेत. सरकारमधील उच्चपदस्थ पोलीस अधिकारी किंवा गृहमंत्र्यांनी पुनावाला यांच्या वैयक्तिक पातळीवर संपर्क साधावा आणि त्यांना सुरक्षेचे आश्वासन द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायाधीश संभाजी शिंदे आणि अभय आहूजा यांच्या खंडपीठाने यासंदर्भात पुढील माहिती देण्यासाठी 10 जून पर्यंतचा कालावधी देखील सरकारला दिला आहे. दरम्यान पुनावाला (adar poonawalla) यांना राज्य सरकारतर्फे Y दर्जाची सुरक्षा दिली होती. याशिवाय केंद्राने सीआरपीएफ जवान तैनात केेले होते. पूनावाला भारतात परतल्यानंतर त्यांना Z दर्जाची सुरक्षा देण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करत आहे. राज्याचे मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी ही माहिती खंडपीठाला दिली आहे.

कोव्हीशील्डच्या पुरवठ्यावरून अदर पुनावाला यांना धमक्यांचे फोन येत आहेत. तसेच त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे पुनावाला यांनी जाहीर केले होते. एका मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयातील वकील दत्ता माने यांनी ॲड.प्रदीप हवनूर यांच्या माध्यमातून रिट याचिका दाखल केली होती. पुनावाला यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी विनंती याचिकेत केली होती. पुनावाला यांना येणाऱ्या धमक्यांच्या फोनमुळे त्यांना देश सोडून इंग्लंडला जाव लागलं आहे. त्यांना योग्य सुरक्षा देण्याच राज्य सरकारच कर्तव्य आहे. त्यामुळे पुनावाला यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे. तसेच त्यांच्या कंपन्यांची सुरक्षा देखील योग्य पद्धतीने व्हावी यासाठी डीजीपी आणि पुणे पोलीस आयुक्तांना सूचना द्याव्यात अशी मागणी वकिलांनी केली आहे.

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

सुबोधकुमार जयसवाल यांच्या चौकशीचा निर्णय मुंबई पोलिसांचा अखेर रद्द

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !