‘बॉन्ड गर्ल’ तान्या रॉबर्ट्सच्या निधनाच्या बातम्या खोट्या; अभिनेत्री अजूनही जिवंत आहे, प्रकृती मात्र गंभीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   जेम्स बॉण्ड (james bond)सिनेमाची ‘बॉण्ड गर्ल’ (Bond Girl) तान्या रॉबर्ट्सला लॉस एंजेलिसच्या सीडर सीनाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. जिथे ३ जानेवारीला तिचं निधन झाल्याचं म्हटलं गेलं. मात्र, त्यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचं समोर आलं आहे. परंतु ती जिवंत आहे. सध्या तीची प्रकृती गंभीर असून हॉस्पिटलमध्येच आयसीयूमध्ये आहे.

१९८५ च्या जेम्स बॉण्ड सिनेमाची बॉण्ड गर्ल आणि ‘अ व्हू टू किल’ मध्ये रोजर मुरसोबत स्टेसी सौटनची भूमिका साकारणारी अभिनेत्री तान्या रॉबर्ट्सचं निधन झाल्याची बातमी समोर आली होती. रिपोर्ट्सनुसार तान्या रॉबर्ट्स ख्रिसमसच्या दिवशी संध्याकाळी तिच्या पाळीव कुत्र्यासोबत फिरून परतली आणि घरात बेशुद्ध पडलेली दिसली. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होत. तान्या रॉबर्टस ६५ वर्षाची असून तिला लॉस एन्जेलिसच्या सीडर सीनाई हॉस्पिटलध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे ३ जानेवारीला तिचं निधन झाल्याचं म्हटलं गेलं.

मात्र, तान्या रॉबर्ट्स ही अजूनही जिवंत आहे. तिच्या तब्येतीत फारशी काही सुधारणा नाहीये. तान्याच्या मित्रमैत्रीणीपैकी एकाने तिच्या निधनाची बातमीला दुजोरा दिला होता. मात्र नंतर असं कळालं की तान्याच्या प्रवक्त्याने रविवारी चुकून तिच्या निधनाची बातमी दिली. पण रॉबर्ट्स अजूनही जिवंत असल्याची बातमी समोर येत आहे.

तान्या रॉबर्ट्सच्या दीर्घकाळापासून प्रतिनिधी असलेल्या माईक पिंगेलने ती जिवंत असण्याचा दुजोरा दिला आहे. सोबतच त्याने तिचे हेल्थ बाबत माहिती देताना म्हटलं आहे कि, देत म्हटलं आहे की, ती अजूनही आईसीयुमध्ये दाखल आहे. मात्र तिच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा नाहीये. चुकीमुळे तिच्या निधनाची बातमी दिली गेली. तान्या रॉबर्टसने ‘अ व्हू टू किल’ व्यतिरिक्त काही टीव्ही शो देखील केले आहेत.