Joint Pain : हिवाळ्यात डायटमध्ये समावेश करा ‘या’ 5 गोष्टी, दूर होईल सांधेदुखी

पोलिसनामा ऑनलाइन – हिवाळा आपल्या सोबत अनेक प्रकारच्या अडचणी घेऊन येतो. यापैकी एक आहे सांधेदुखीची समस्या. थंडीत बहुतांश लोक विशेषकरून ज्येष्ठ व्यक्तींच्या हाडांमध्ये आणि सांध्यात वेदना होऊ लागतात. औषध आणि मॉलिशशिवाय खाण्या-पिण्याच्या काही वस्तूसुद्धा सांधेदुखी दूर करण्यासाठी उपयोगी ठरतात. जाणून घेवूयात अशा पाच वस्तू…

केसर-हळद दूध –
1 हे दुध गाठीच्या दुखण्यावर उपयोगी आहे. अँटी इंफ्लेमेटरी गुणांमुळे सांधेदुखीत आराम मिळतो. दूध कॅल्शियमचा चांगला स्त्रोत असल्याने हाडे मजबूत होतात.

2 डिंग-गुळाचा लाडू –
डिंकाचा लाडू अनेक आजार दूर करतो. हिवाळ्यात याच्या सेवनाने शरीर गरम राहाते. सोबत हाडे मजबूत होतात.

3 संत्रे आणि गाजरचे डिटॉक्स ड्रिंक –
या ड्रिंकमध्ये संत्रे, गाजर आणि आले असते. यात अँटी इंफ्लेमेटरीसह कॅल्शियम सुद्धा भरपूर असते. यामुळे हाडांचे घनत्व वाढते आणि वेदना दूर होतात.

4 पेरू आणि पनीर सलाड –
पेरूत, कापलेले पनीर, गुळ आणि थोडी चिंच टाकून सलाड तयार करा. यातील कॅल्शियममुळे हाडांच्या वेदना कमी होतात.

5 ब्रोकली आणि बादामचे सूप –
याचे गरमागरम सूप हिवाळ्यात घ्यावे. यात कल्शियम आणि ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड भरपूर असल्याने हाडांसाठी टॉनिकचे काम करते.