Boney Kapoor | ‘या’ कारणामुळे बॉलिवूड चित्रपट फ्लॉप ठरतात, बोनी कपूर यांनी सांगितले कारण

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Boney Kapoor | कोरोना (Corona) नंतरचा काळ बॉलिवूडसाठी (Bollywood) काही खास राहिला नाही. बॉक्स ऑफिसवर (Box Office) बॉलिवूडचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. आमिर खान (Aamir Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) यांसारख्या मोठ्या अभिनेत्याचे पिक्चरसुद्धा काही कमाल करू शकले नाहीत. याउलट दाक्षिणात्य चित्रपट (South Movies) बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून साऊथ चित्रपटांचे रिमेक करण्याचा एक ट्रेंड बॉलिवूडमध्ये सुरू आहे. यामुळे प्रेक्षक बॉलिवूडच्या चित्रपटांकडे पाठ फिरवत आहेत. (Boney Kapoor)

 

बॉलिवूड क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून नवीन चेहऱ्यांना अजिबातच संधी दिली जात नाही आहे. अनेक कलाकार आपल्या मुला- मुलींना चित्रपटामध्ये लाॅन्च करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. हे लोकांना आवडत नसल्यामुळे हे या चित्रपटाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. विक्रम वेधा आणि जर्सी सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर का अपयशी ठरले याचा खुलासासुद्धा बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी यावेळी केला. बोनी कपूर लवकरच हेलन या मल्याळम चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक (Bollywood Remake) घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे याच चित्रपटात त्यांची मुलगी अर्थात जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) मुख्य भूमिकेत असणार आहे.

बॉलिवूडची चित्रपट फ्लॉप ठरायचे आणखी एक कारण बोनी कपूर यांनी सांगितले आहे.
ते म्हणाले कि, साऊथ चित्रपटांचे हिंदी रिमेक बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होण्याचे एक कारण म्हणजे ते पूर्णपणे कॉपी पेस्ट केले जात आहेत.
एवढेच नाहीतर साऊथच्या चित्रपटांचे टायटल्सही कॉपी पेस्ट केले जात आहे.
या कारणामुळे प्रेक्षक बॉलीवूडकडे पाठ फिरवत आहेत.

 

 

Web Title :- Boney Kapoor | boney kapoor said the main reason why bollywood movies flop

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा