‘बधाई हो’चा रिमेक ‘या’ चार भाषांमध्ये , बोनी कपूर करणार दिग्दर्शन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमित रविंद्रनाथ शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला ‘बधाई हो’ हा चित्रपट 2018 मधील सुपरहिट चित्रपट ठरला होता. आता या चित्रपटाचा रिमेक येत आहे. चाहत्यांसाठी नक्कीच हा सुखद धक्का आहे. ‘बधाई हो’चा रिमेक दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणार आहे. चित्रपटाची अजबगजब कथा कलाकारांचा भन्नाट अभिनय यामुळे या चित्रपटाला चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते.

आता या चित्रपटाचा रिमेक कन्नड, मल्याळम, तमीळ आणि तेलगु या चार भाषांमध्ये येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बोनी कपूर करणार आहेत. त्यांनी सर्व हक्क विकत घेतले आहेत.

या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक-नर्माते बोनी कपूर म्हणाले की, “बधाई हो चित्रपट सर्वांनाच आवडेल असा आहे. त्यामुळे चित्रपटाचा रिमेक दक्षिणात्य भाषांमध्ये बनवण्यासाठी मी उत्सूक आहे. ‘बधाई हो’चे जगभरात खूप कौतुक झाले. म्हणून आता दक्षिणात्य भाषांमध्ये हा चित्रपट तुफान चालेल असा माझा विश्वास आहे. मी लवकरच चित्रपटाचे शुटिंग सुरु करणार आहे.”

बधाई हो या चित्रपटाचा 2018 मध्ये बाॅक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे. अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव हे कलाकार या चित्रपटात झळकले होते.

Loading...
You might also like