Bonus Announcement | कंपनीने 210 कोटींच्या बोनसची केली घोषणा, आनंदाने नाचू लागले कर्मचारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bonus Announcement | एका कंपनीने आपल्या सर्व 5400 कर्मचार्‍यांना सुमारे 4 – 4 लाख रुपयांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे. एम्प्लॉयमेंट अ‍ॅप्रिसिएशन पार्टीदरम्यान (Employee Appreciation Party ) ही घोषणा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व कर्मचारी नाचू लागले. (Bonus Announcement)

 

हे प्रकरण अमेरिकेतील लास वेगासचे आहे. कॉस्मोपॉलिटन कंपनीचे सीईओ बिल मॅकबेथ एका भव्य समारंभात स्टेजवर आले. त्यानंतर त्यांनी एक धक्कादायक घोषणा केली. त्यामुळे त्यांच्या कंपनीला सुमारे 210 कोटींचा खर्च उचलावा लागणार आहे.

 

कॉस्मोपॉलिटन हे लास वेगासचे एक अतिशय आकर्षक स्ट्रिप रिसॉर्ट आहे. ते 2010 मध्ये उघडण्यात आले. पण लवकरच तोट्यात गेले. त्यानंतर 2014 मध्ये ब्लॅकस्टोनने ते 131 अरब रुपयांना विकत घेतले होते. (Bonus Announcement)

 

रिसॉर्ट कंपनीच्या या घोषणेनंतर इव्हेंट हॉलमध्ये उपस्थित प्रत्येकाला आनंद झाला. हजारो कर्मचारी नाचू लागले. ते एकमेकांना मिठी मारत होते. सुमारे चार लाख रुपयांचा बोनस मिळाल्याने कर्मचार्‍यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

महामारीत केलेल्या कामाचे बक्षीस
कॉस्मोपॉलिटनचे डॅनियल एस्पिनो म्हणाले – ते तुम्ही लोकच आहात जे दिवस खास बनवतात. जरी तुम्ही खोली स्वच्छ केलीत तरी. तुम्ही अन्न बनवता, कार्डे हाताळा, पेय देता किंवा फ्रंट डेस्कवर काम करता.

इव्हेंटदरम्यान, कॉस्मोपॉलिटन आणि प्रायव्हेट इक्विटी फर्म ब्लॅकस्टोन रिअल इस्टेट अमेरिकाचे अधिकारी उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळात चांगले वातावरण राखल्याबद्दल फर्मने कर्मचार्‍यांना हे बक्षीस दिले आहे.

 

2014 मध्ये ही कंपनी ब्लास्टनने विकत घेतली
गेल्या 7 वर्षांत, मॅकबेथच्या रिसॉर्टने सुमारे 70 कोटी रुपये चॅरिटीसाठी दान केले आहेत.
आता सर्व कर्मचार्‍यांना बोनस देण्यासाठी कंपनीला सुमारे 210 कोटी रुपये लागणार असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले.

नवेदा गेमिंग कंट्रोल बोर्डाच्या वार्षिक गेमिंग अ‍ॅब्स्ट्रॅक्टनुसार,
लास वेगास कॅसिनोला गेल्या वर्षी महामारीच्या प्रतिबंधांमुळे सुमारे 1,600 कोटी रुपयांचा तोटा झाला.

 

Web Title :- Bonus Announcement | resort surprises 5400 employees with 4 lakh rupees bonus

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा