भारत जशास तसे उत्तर देणारा देश बनला : निवृत्त एअर मार्शल भुषण गोखले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशाच्या संरक्षण दलांचे काम आपापल्या पातळ्यांवर सुरु असते. महत्वाच्या व्यक्तीपर्यंत निर्णय पोहचविण्यात त्यांच्यात कमालीची चुरस असते. मात्र यात वेळ जातो हे त्यांच्या लक्षात येत नाही. मात्र या पध्दतीने होणाऱ्या कामाच्या स्वरुपात आता बदल होत आहे. आक्रमण झाल्यावर उत्तर देऊ ही मानसिकता असलेल्या भारताची भूमिका कधीच बदलली आहे. आता भारत हा आक्रमणाला जशास तसे उत्तर देणारा देश बनला आहे. असे मत निवृत्त एअर मार्शल व माजी हवाईदल उपप्रमुख भूषण गोखले यांनी व्यक्त केले.

अविनाश थोरात लिखित आणि विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रकाशित ‘अजित डोवाल गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे श्रमिक पत्रकार संघात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त पोलीस महासंचालक अजित पारसनीस होते. तर नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट, माजी आमदार उल्हासदादा पवार, अंकुश काकडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी, पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे, भारत देसडला हे मान्यवर उपस्थित होते.

दहशतवाद वेगवेगळ्या प्रकारे समोर येत आहे
गोखले म्हणाले, भारतावर आक्रमण झाल्यावर चर्चा आणि मग उत्तर देऊ असा भारत आता राहिला नाही. भारतात आता जशास तसे उत्तर देण्याची मानसिकता रुजू लागली आहे. दहशतवाद वेगवेगळ्या पध्दतीने आपल्यासमोर येत आहे. समाज माध्यमांचा सर्वाधिक प्रभाव आहे. त्यावर वाचक, दर्शक यांची मानसिकता बदलण्याचे आमि त्याला वेगळीच दिशा देण्याचे काम प्रभावीपणे केले जात आहे. येत्या काळात संरक्षणाच्या दृष्टीने या समजामाध्यमांना समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी देशाबद्दलची विश्वसनीयता या माध्यमांतून विविध प्रकारे समोर येत आहे.

रुढ अर्थाने हे चरित्र नाही
लेखक थोरात यांनी आपली भूमीका मांडली. ते म्हणाले की, रुढ अऱ्थाने हे डोवाल यांचे चरित्र नाही. तर डोवाल यांची हेरगिरी ते मुत्सदगिरीच्या प्रवासात देशाकरिता बजावलेल्या कामगिरीची सर्वांना माहिती व्हावी यासाठी हे पुस्तक समोर आणले आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार योगेश कुटे यांनी केले
सत्य,भास आणि आभास याची प्रचिती देणारे काम गुप्तहेरांचे असते. त्यांच्या कामाबद्दल सर्वसामान्य़ाना अप्रुप असते. गुप्तहेर आपल्याच सावलीच्या अनोख्या जगात राहवे लागते. कुशल गुप्तहेर गोंधळाची परिस्थिती असताना त्या परिस्थितीचा फायदा घेणारा असतो. त्याला नेहमीच पडद्याआडून काम करावे लागते. डोवाल यांची कामगिरी वादातीत आहे. परंतु यासाठी त्यांनी खडतर परिश्रम घेत अनेकदा जीवावरची जोखीम पत्करली आहे. असे पारसनीस यांनी यावेळी सांगितले.

Loading...
You might also like