खुशखबर ! ‘Debit Card’ने बुक करा विमानाचं तिकीट अन् मिळवा ‘भरघोस’ सुट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबर विविध ऑफरही देत असते. आता विमानाने प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी एसबीआय ने ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग कंपनी ‘यात्रा’च्या मान्सून सेल च्या माध्यमातून एक धमाकेदार ऑफर आणली आहे. तुम्ही SBI डेबिट कार्ड च्या माध्यमातून तिकीट बुक केल्यास तुम्हाला तब्ब्ल ८ हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.

किती मिळेल डिस्काउंट :

या ऑफर च्या नियमांनुसार डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय बुकिंग साठी वेगवेगळ्या ऑफर आहेत. डोमेस्टिक फ्लाइट साठी कमीत कमी ४ हजार रुपयांचं बुकिंग करावं लागेल तर आंतरराष्ट्रीय साठी २५ हजार रुपयांचं बुकिंग करावं लागणार आहे. तरच हि ऑफर मिळेल. तसेच डोमेस्टिक साठी १२०० तर आंतरराष्ट्रीय साठी ८००० रूपये इतका जास्तीत जास्त डिस्काउंट मिळेल.

कसा मिळवाल ऑफर चा फायदा :

एका डेबिट कार्ड वर एकाच ऑफर मिळेल. या ऑफरसाठी ‘SBI19’ हा प्रोमो कोड वापरावा लागेल. याशिवाय Yatra.com वरून बुकिंग करूनही तुम्ही ऑफरचा लाभ घेऊ शकता किंवा यात्रा कंपनीचे अ‍ॅप देखील उपलब्ध आहे. या ऑफर च्या माध्यमातून १० टक्के सूट दिली जाणार आहे. मात्र यासाठी तुमचं बुकिंग निश्चित म्हणजेच कन्फर्म असायला हवं म्हणजे बुकिंग रद्द केलंत तर कसलीही सूट मिळणार नाही. एका कार्ड वरून केवळ एकदाच ऑफरचा लाभ घेऊ शकता.

तसेच या ऑफरबरोबर तुम्ही दुसरी कोणतीही ऑफर वापरू शकत नाही. हि ऑफर कधीही रद्द केली जाऊ शकते. याचे सर्वाधिकार SBI आणि यात्रा यांच्याकडे आहेत. मान्सून सेल च्या माध्यमातून हि ऑफर दिलेली असून पावसाळ्यात भटकंतीचा प्लॅन असणाऱ्या ग्राहकांसाठी हि खास ऑफर असल्याचे यात्रा कंपनीने म्हटले आहे.

शरीरा तील विषारी घटक बाहेर टाकणे आवश्यक, करा हे उपाय

शारीरीक दुर्बलता दूर करण्यासाठी पुरुषांनी कांद्या चा असा करावा उपयोग

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

पहलू खान लिंचिंग प्रकरण : कॉंग्रेस आता भाजपची कॉपी बनले आहे : ओवेसी

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार