खुशखबर ! ‘धनतेरस’ला बाजार भावापेक्षा एकदम ‘स्वस्त’ मिळणार सोनं, फक्‍त ‘एवढं’ काम करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार सुरु आहे. नवरात्रीचा सण सुरु झालेला आहे. आगामी काळात दसरा, दिवाळी सारखे सणही आहेत. पितृपक्षात सोन्याचा दर चांगलाच ढासळला होता. परंतु येणाऱ्या सणांमध्ये नेहमीप्रमाणे चांगलीच तेजी येण्याची शक्यता आहे. मिळलेल्या माहितीनुसार अनेकांनी सोन्याचे बुकिंग केले आहे आणि ते येणाऱ्या धनत्रेयदशीच्या दिवशी आपली डिलेव्हरी घेणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आता सोने खरेदीचे बुकिंग केले तर शुभ मुहूर्तावर त्याची डिलिव्हरी घेऊ शकता.


अमेरिकेतील डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये बराच फरक पडताना दिसत आहे. पूर्ण आठवड्यात सोन्या चांदीच्या दरामध्ये चांगलीच घसरण पहायला मिळाली. अंतरराष्ट्रीय बाजारात सोने एका आठवड्यानंतर 1,500 डॉलर प्रति तोळा वरून खाली पडले आहे.

डॉलर झाला मजबूत
अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि फायदा जास्त झाल्यामुळे सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मात्र सण उत्सव सुरु होण्याआधी सोन्यामध्ये घसरण झाल्यामुळे सोने खरेदीत वाढ होणार आहे असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे.

Silver

चांदीमध्ये सुद्धा झाली घसरण
त्याचबरोबर चांदीची किंमत डिसेंबरच्या करारामध्ये  2.34  टक्क्यांनी घटून प्रति ग्रॅम 17.49 डॉलरवर इतकी होती. केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया म्हणाले की, चीन सोन्या-चांदीचा मोठा खरेदीदार आहे आणि पुढील महिन्याच्या सुरूवातीला चीमध्ये पाच दिवसांची राष्ट्रीय सुट्टी असेल, ज्यामुळे सोन्या – चांदीची नफा बुकिंग दिसून येत आहे.

डॉलर होतोय मजबूत
सोने आणि चांदीच्या दरात कमतरता येण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे डॉलरच्या दरामध्ये मजबुती येणे. जगभरातील चलनव्यवस्थेच्या मानाने डॉलरची ताकद खूपच वाढत आहे. सलग तीन दिवसांच्या तेजीमुळे डॉलर 98.95 च्या स्तरापर्यंत पोहचला आहे.

अमेरिका चीनमधील सामंजस्यता
अमेरिका आणि चीनमधील व्यापार सुधरवण्यासाठी दोनीही देशांमध्ये नवीन संबंधांना पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. ज्यामुळे स्टॉक बाजारात पुन्हा तेजी आली आहे.शेअर वाढीमुळे सोन्या – चांदीकडे गुंतवणूकदारांचा कल कमजोर झाला आहे.

सणासुदीचा सीझन
केडिया म्हणाले की, भारतीय बाजारात सणासुदीच्या हंगामात ही घसरण झाली असली तरी ग्राहक खरेदीकडे आकर्षित होतील. शनिवारी पितृपक्ष संपत असून रविवारी नवरात्र सुरू होत आहे. खरेदीचा हंगाम नवरात्रीपासून सुरू होईल.

Visit : Policenama.com