‘आधार’कार्ड ‘अपडेट’ करण्याच्या नियमांत UIDAI कडून ‘हे’ नवीन बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला यापुढे तुमच्या आधारकार्डमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करायचे असल्यास तुम्हाला अतिशय सोपा मार्ग अवलंबवा लागणार आहे. आधार अपडेट करणाऱ्या UIDAI या कंपनीने आपल्या काही नियमांत बदल केले आहेत. यासाठी कंपनीने विविध शहरांत ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आधार सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. याठिकाणी तुम्ही आधार संबंधित तक्रारींचे निवारण करू शकता. त्याचबरोबर यामध्ये हवे ते बदल देखील करू शकता.

कुठे मिळणार हि सुविधा
हि सुविधा तुम्हाला UIDAIच्या बँकांमध्ये तसेच सरकारी कार्यालयांमध्ये तसेच पोस्ट ऑफिसमध्ये देखील मिळणार आहेत. दिल्ली, चेन्नई, भोपाळ, आग्रा, हिस्सार, विजयवाडा आणि चंदीगडमध्ये या सेवा मिळणार आहेत. त्याचबरोबर आणखी काही शहरांत देखील लवकरच या सेवा सुरु होणार आहेत. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे.

या कारणांसाठी घ्यावी लागणार अपॉइंटमेंट
1)
नाव बदलण्यासाठी
2) पत्ता बदलण्यासाठी
3) जन्मतारीख बदलण्यासाठी
4) मोबाईल नंबर बदलण्यासाठी
5) ई-मेल आयडी बदलण्यासाठी
6) लिंग बदलण्यासाठी

अशा प्रकारे घ्या अपॉइंटमेंट
सर्वात आधी तुम्हाला UIDIA ची वेबसाईट https://uidai.gov.in वर जावे लागेल. त्यानंतर तुम्ही ‘My Aadhaar यावर क्लिक केले असता बुक एन अपॉइंटमेंट असा पर्याय दिसेल. त्यानंतर तुम्हाला त्याठिकाणी तुमचे शहर आणि त्यानंतर प्रोसेस्ड टू बुक एन अपॉइंटमेंट यावर क्लिक करायचे आहे.त्यानंतर उघडलेल्या नवीन पानावर तुम्हाला न्यू आधार, आधार अपडेट आणि मॅनेज अपॉइंटमेंट असे तीन पर्याय येतील. यातील तुम्ही मॅनेज अपॉइंटमेंट या पर्यायावर क्लिक केले असता तुम्हाला पुढे दिलेल्या पर्यायांनुसार पुढील पद्धत करत ऑनलाईन पद्धतीने अपॉइंटमेंट घेऊ शकता.

आरोग्यविषयक वृत्त –