ग्राहकांसाठी खास सुविधा ! फक्त एका मिस कॉलवर गॅस सिलेंडर बुक करता येणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन ऑईलच्या इंडेन गॅसच्या ग्राहकांना एक खास सुविधा उपलब्ध केली आहे. तर यापूर्वी गॅस बुक करण्यासाठी काही अवधी लागत होता. आता मात्र विनामूल्य केवळ एक मिस्ड कॉल मध्ये एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) बुक होणार आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही एलपीजी सिलिंडर बुक करता येणार आहे. यामुळे वेळेची सुद्धा बचत होणार आहे. तर ही सुविधा IVRS सिस्टममध्ये स्वत:ला आरामदायक नसलेल्या अशा नागरिकांना आणि ज्येष्ठांसाठी खास सोयीची असल्याचे इंडियन ऑईलने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. काय आहे प्रक्रिया जाणून घ्या.

या क्रमांकावर करा मिस्ड कॉल –
LPG गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी 8454955555 क्रमांकावर मिस कॉल करा.

व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) सुद्धा बुक करता येणार –
व्हॉट्सअ‍ॅपद्वारे गॅस सिलिंडर बुक करण्याचे काम एकाच मेसेजद्वारे करता येते. यासाठी सर्व कंपन्यांनी हा क्रमांक दिला आहे. यासाठी फक्त REFILL टाइप करून सेंड करावे लागेल. तर व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने स्टेटसही शोधता येणार आहे.

या क्रमांकावर मेसेज करा –
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे ग्राहक असल्यास त्यांना व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक दिला आहे. यासाठी नोंदणीकृत क्रमांकावरून रेफिल टाईप करून ग्राहकाला 7588888824 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करणे.

दरम्यान, बुकिंग केलेल्याची स्थिती हवी असेल तर WhatsApp वर ही सेवा उपलब्ध आहे. यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून STATUS # टाईप करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला ऑर्डर नंबर मिळेल. समजा ग्राहकाचा बुकिंग नंबर 12345 असेल तर STATUS # 12345 आणि WhatsApp मेसेज 7588888824 नंबरवर टाइप करावा लागेल. STATUS # आणि ऑर्डर क्रमांक यावर कोणताही मध्ये स्पेस नाही हे लक्षात ठेवा.