ऑनलाइन बुकिंग करून हॉटेलच्या रूममध्ये बोलावली ‘कॉलगर्ल’, काही वेळात ‘गर्लफ्रेन्ड’च आली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकवेळा मॅरेज चुकीच्या व्यक्तीला जाऊन याचे गंभीर परिणाम देखील भोगावे लागतात. अशाच प्रकारची घटना एका 20 वर्षीय चीनमधील मुलाबरोबर घडली असून त्याने मौजमजा करण्यासाठी एका कॉलगर्लला मॅसेज केला. मात्र तो मॅसेज चुकून त्याच्या गर्लफ्रेंडला गेला. त्यानंतर मात्र त्याच्यावर भलतेच संकट कोसळले.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील हुबेई येथील राहणाऱ्या या तरुणाने आपल्या मित्रांबरोबर केलेल्या पार्टीनंतर एका कॉलगर्लला मॅसेज करत तिला संपूर्ण रात्रीसाठी बुक केले. त्यावेळी त्याने तिच्या खात्यावर 4000 रुपये देखील पाठवले. त्याचबरोबर हॉटेलचे नाव आणि रूम नंबर देखील मॅसेज केला.

काही वेळानंतर वाजली डोअरबेल
अर्ध्या तासानंतर त्याच्या रूमची बेल वाजली. त्यानंतर त्याने दरवाजा उघडला असता त्याला धक्काच बसला. दरवाजामध्ये त्याची गर्लफ्रेंड उभी होती. त्यावेळी त्याच्या लक्षात त्याची चुकी आली. त्याने चुकून आपल्या गर्लफ्रेंडला मॅसेज करून पैसे देखील तिच्याच खात्यात टाकले होते.

गर्लफ्रेंडने केला आरडाओरडा
त्यावेळी त्याने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याचे काहीही न ऐकता आरडाओरडा सुरु केला. त्यांच्या दोघांच्या आवाजाने इतर आजूबाजूचे देखील गोळा झाले. त्यांच्या या भांडणाला हॉटेल कर्मचाऱ्यांना देखील सांभांळणे अवघड झाले.

पोलिसांना दिली माहिती
भांडण वाढू लागल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांनाही समजावत पोलिसांनी शांत केले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like