खुशखबर ! 1 नोव्हेंबर पासुन IRCTC व्दारे ऑनलाईन तिकीट बुक करणं 50% स्वस्त, ‘असं’ करावं लागणार बुकिंग

पोलीसनामा ऑनलाइन टीम – IRCTC वरुन तिकिट बूक करताना BHIM अ‍ॅपच्या माध्यमातून पेमेंट केल्यास त्यावर लागणारा शुल्क आता नॉन एसीसाठी 10 रुपये आणि एसी क्लाससाठी 20 रुपये असले. हे शुल्क आधी नॉन एसीसाठी 20 रुपये आणि एसीसाठी 40 रुपये असे होते. हे नवे शुल्क 1 नोव्हेंबरपासून लागू होतील. त्यामुळे IRCTC च्या माध्यमातून तिकिट बूक करणाऱ्यांना 1 नोव्हेंबरपासून तिकिट 50 टक्के स्वस्त मिळेल.

तसे IRCTC च्या माध्यमातून तिकिट बूक करणे तसे महागले आहे. परंतू प्रवाशांनी तिकिटाचे पेमेंट भीम अ‍ॅपच्या माध्यमातून केले तर त्यांना तिकिट स्वस्तात उपलब्ध होईल.

या महिन्यात IRCTC ने रेल्वेच्या तिकिटावर सेवा शुल्क आकारणे सुरु केल्याने नॉन एसी रेल्वे तिकिट बुक केल्यावर 15 रुपये आणि एसी क्लासच्या तिकिटावर 30 रुपये शुल्क आकारण्यात येते. हे सेवा शुल्क जीएसटी शिवाय आकारले जातील. त्यामुळे भीम अ‍ॅपच्या माध्यातून पेमेंट केले तर 1 नोव्हेंबरपासून तुम्हाला कमी शुल्क द्यावे लागेल.

पहिल्यांदा लागत होते 20 रुपये आणि 40 रुपये शुल्क –

सरकारने 3 वर्षापू्र्वी IRCTC वरुन तिकिट बुक करण्यासाठी आकारण्यात येणारे सेवा शुल्क रद्द केले होते. डिजिटल पेमेंटला प्रोस्ताहन देण्यासाठी हे करण्यात आले होते. हे शुल्क आधी नॉन एसीसाठी 20 रुपये आणि एसीसाठी 40 रुपये असा होता.

2017 पर्यंत सेवा शुल्कात सूट देण्यात आली होती. नंतर ही सूट वाढवण्यात आली. परंतू रेल्वेला होणारे नुकसान पाहून रेल्वेने हे सेवा शुल्क पुन्हा लागू केले आहे. 2016 – 2017 या वर्षात इंटरनेट तिकिट महसूल 26% ने घटला होता.