COVID-19 and Children : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून तुमच्या मुलाला वाचवायचे असेल तर त्याच्या डाएटमध्ये करा ‘या’ 7 गोष्टींचा समावेश

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या coronavirus दुसर्‍या लाटेचा  कहर आता कमी झाला असला तरी आणखी तिसर्‍या लाटेच्या विध्वंसाचे संकेत तज्ज्ञांना मिळाले आहेत. असे म्हटले जाते की, तिसरी लाट लहान मुलांसाठी Children धोकादायक ठरू शकते. या व्हायरसपासून coronavirus आपल्या मुलांना सुरक्षित ठेवायचे असेल तर त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना आतून मजबूत केले पाहिजे. म्हणजेच त्यांची इम्यूनिटी ( immunity) मजबूत केली पाहिजे. मुले असोत की प्रौढ, सर्वांची इम्यूनिटी ( immunity)  ही चांगल्या डाएटने मजबूत होते. मुलांना तिसर्‍या लाटेपासून third wave of coronavirus वाचवण्यासाठी त्यांच्या डाएटमध्ये Diet कोणत्या गोष्टींचा समावेश करावा ते जाणून घेवूयात…

1 हंगामी फळे :
मुलांची इम्युनिटी मजबूत करण्यासाठी त्यांच्या डाएटमध्ये हंगामी फळांचा समावेश करा.

2 खाण्यात गोड आवश्य द्या :
मुलांना जेवणानंतर किंवा दिवसात कधीही गोड लाडू, मीठाई किंवा गुळ काहीही गोड आवश्य द्या. तूप आणि गुळाची चिक्की किंवा शिरा मुलांना उर्जा प्रदान करतो.

3 तांदळाचा करा समावेश :
तांदूळ पचायला हलके असतात, यात अनेक पोषकतत्व, तसेच अमिनो अ‍ॅसिड असते. याचा जेवणात समावेश करा. डाळ-भात आणि तूप मुलांसाठी बेस्ट डाएट आहे.

4 खाण्यात आंबटही आवश्यक :
मुलांच्या रोजच्या जेवणात लोणचे, चटणी, किंवा इतर आंबट पदार्थ आवश्य द्या. यामुळे इम्यूनिटी मजबूत होते.

5 काजू द्या :
काजू मुलांना आवडतात. यामध्ये पोषकतत्व असल्याने एनर्जीसाठी मुलांना काजू आवश्य द्या.

6 मुलांच्या झोपेची काळजी घ्या
मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी झोप आवश्यक आहे. चांगल्या झोपेमुळे इम्यूनिटी वाढते.

7 जंक फूड बंद करा :
जंक किंवा प्रोसेस्ड फूड्स मुलांसाठी धोकादायक आहे, यामध्ये भरपूर ट्रान्स फॅट आणि कमी पोषकतत्व असतात. यामुळे मुलांचे वजन वाढते. शरीराचे पोषण होत नाही. मुलांना या फूड्सपासून दूर ठेवा.

Also Read This : 

 

चाणक्य नीती : सुखी दाम्पत्यासाठी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

 

मस्करा लावताना आपण देखील ‘या’ चुका करता का ?, जाणून घ्या

 

Coronavirus : कोरोनाची तिसरी लाट दुसर्‍या लाटे एवढीच भीषण, जोर 98 दिवस कायम राहील !

 

‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’ वरदानच, जाणून घ्या

 

महिलेच्या मृत्यूनंतर रेल्वे पोलिसाचे अजब उत्तर, म्हणाले – ‘आधीच मनुष्यबळ कमी, सगळीकडं कस लक्ष देणार’

 

Hair Care : आरोग्यासह सौंदर्याचीही विशेष काळजी घ्या