Booster Dose : नव्या संशोधनानुसार खुलासा ! Covid लसीचे 2 डोस घेतल्यानंर आता ‘बुस्टर’ डोसही घेणं आवश्यक?

Advt.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकटात अनेकांचा जीव जातो आहे. भारतात काही दिवसापूर्वी कोरोना रुग्णाच्या संख्येत घट दिसून येत आहे. तर कोरोना विषाणूपासून बचावासाठी देशात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रथम ४५ वर्षावरील व्यक्तींना लस Vaccine देण्यास मान्यता देण्यात आली. नंतर १८ वर्षावरील सर्वाना लस Vaccine देण्याचा निर्णय सरकारने घेतला. व्यक्तीला कालावधीप्रमाणे दोन लसी Vaccine घ्यावे लागत होते.

देशात भारत बायोटेकचे कोव्हॅक्सिन आणि सिरमची कोविशिल्ड अशा दोन लसी दिल्या जात आहे. याचबरोबर स्पुतनिक व्ही लस देखील भारतात आली आहे. मात्र तज्ज्ञांच्या एका अभ्यासानुसार एक अहवाल दिला आहे. या अहवालानुसार सांगितलं आहे की, केवळ या दोन लसी घेऊन आपण कोरोनापासून बचाव करू शकत नाही. यानुसार, कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर शरीरात पर्याय अँन्टिबॉडीज तयार होतात. यामुळे जेव्हा कधीही कोरोना शरीरात प्रवेश करतो तेव्हा या अँन्टिबॉडीज विषाणूशी मुकाबला करतात आणि त्या व्यक्तीला हानी होऊ देत नाही.

संशोधनाच्या माहितीनुसार, कोरोना लसीचे २ डोस सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेसे नाहीत तर शरीरात रोगप्रतिकारशक्ती क्षमता वाढवण्यासाठी आता लसीचा बूस्टर शॉट हेदेखील घेणे आवश्यक आहे. असे या अहवालानुसार सांगण्यात आलं आहे. कोरोना लस व्यक्तीचा बचाव करू शकते. मात्र, १ वर्षानंतर लसीपासून निर्माण झालेली अँन्टिबॉडीमध्ये घट होण्यास सुरूवात होईल. त्यासाठी बूस्टर डोस घ्यावी लागेल असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान AIIMS मध्ये ५ लोकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. बूस्टर डोस अशा लोकांना दिला जात आहे. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन सहा महिने पूर्ण झालेत.

बूस्टर (Booster) डोस म्हणजे काय?
एसएन मेडिकल कॉलेजच्या प्रा.आरती अग्रवाल यांनी माहिती दिली आहे की, लसीचे २ डोस घेतल्यानंतर आता बूस्टरसाठी काम सुरू आहे. भारत बायोटेकनं अलीकडेच दिल्लीत बूस्टर डोसवर चाचणी घेतली. ६ महिन्यापूर्वी लस घेतलेल्या लोकांवर याची चाचणी केली आहे. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

बूस्टर (Booster) शॉट म्हणजे काय ?
बूस्टर मुख्य स्वरुपात लसीच्या १ अथवा २ डोसनंतर काही काळाने देण्यात येणारा आणखी एक डोस आहे. जो आपल्या शरीरात असणाऱ्या रोगप्रतिकारशक्तीला सक्रीय ठेवण्यास मदत करते. त्यामुळे अँन्टिबॉडीज पुन्हा एकदा व्हायरसची लढण्यासाठी सक्षम असतात.

या दरम्यान, लस घेतल्यानंतर १ किंवा २ वर्षाच्या कालावधीत बूस्टर डोस घ्यावी लागणार आहे. लसीच्या डोसमध्ये उपलब्ध असणाऱ्या औषधाप्रमाणे बूस्टर काम करतं. मात्र ते अधिक फायदेशीर आहे. वैद्यकीय प्रमाणानुसार एकत्रच औषधाचा खुराक घेण्याऐवजी लहान औषधांचा डोस काही अंतरानं घेतला तर तो अधिक फायद्याचा ठरणार आहे. तसेच, बूस्टर डोस लहान मुलांना दिला जातो. जन्मानंतर करण्यात येणारं लसीकरणात दीड वर्षानंतर बूस्टर त्याव्यतिरिक्त ५, १० आणि १६ वर्षापर्यंत बूस्टर डोस दिला जातो. याप्रमाणेच कोरोना लसीकरणानंतर बूस्टर डोस घ्यावी लागणार आहे. मात्र, याचा कालावधी कमीही होऊ शकतो. या दरम्यान, ही वर्षभर अथवा पाच वर्षाच्या काळातही देता येऊ शकते. सध्या लसीवर काम सुरू आहे. त्यामुळे लसीचे डोस घेतल्यानंतर किती कालावधीत बूस्टर डोस देण्याची गरज पडेल हे स्पष्ट नाही. सध्या एक वर्षाचा कालावधी मानला जात आहे.