बोपदेव घाटात लक्झरी पलटली , दहा जण जखमी

पुणे पोलीसनामा ऑनलाईन

आज (रविवारी) सकाळी आठच्या दरम्यान बोपदेव घाटाजवळ ब्रेक फेल झाल्याने लक्झरी गाडी पलटी झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले असून उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती.

सासवड कडुन बोपदेवघाट पुणेकडे ही लक्झरी बस येत होती. बसमध्ये १० ते १२ प्रवाशी प्रवास करत होते. अचानक बोपदेव घाटाच्या काॅर्नरला बसचे ब्रेक फेल झाले आणि चालकाचा ताबा सुटला त्यामुळे गाडी बाजूच्या डिव्हायडरला धडकून पलटी झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही लक्झरी बस मध्यप्रदेशची असून सर्व प्रवाशी मध्यप्रदेशातीलच आहेत. अपघातानंतर नागरिकांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.