संरक्षक दलाच्या 10 हजार 500 कोटीच्या प्रकल्पांना मंजुरी, सीमा भागात बारकाईने टेहळणी होणार

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी भारताच्या संरक्षण दलाने नुकतीच १० हजार ५०० कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता सीमा भागात अधिक बारकाईने टेहळणी करण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक सहा विमाने समाविष्ट करण्यात येणार आहे.सध्या टेहळणीचे काम भारतीय बनावटीचे नेत्र आणि इस्रायली-रशियन बनावटीची फाल्कन ही विमाने करत आहेत.

नव्या प्रकल्पांतर्गत आकाशातून येणाऱ्या वस्तूची खूप आधीच सूचना देणारी यंत्रणा एअरबस ए ३२० विमानांवर बसविण्यात येणार आहे. ही यंत्रणा डीआरडीओ विकसित करीत आहे. वास्तविक पाहता भारत-पाकिस्तानच्या १९७१च्या युद्धानंतरच हा प्रकल्प हाती घेण्यात येणार होता. परंतु तो प्रत्यक्षात उतरण्यास १९९०चे दशक उजाडले. त्यावेळी डीआरडीओने यासाठी खास प्रयोगशाळा तयार केली. याचा सुरूवातीचा काळ खडतर होता. सुरूवातीला ऐरावत या नावाने प्रकल्प हाती घेण्यात आला होता. १९९६ व १९९८ च्या एअर शोमध्ये त्याचा सहभागही होता. परंतु जानेवारी १९९मध्ये हे विमान तामिळनाडूमध्ये कोसळून हवाई दलाचे ४ अधिकारी व ४ शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला होता.