केवळ बिस्किटाच्या ‘टेस्ट’ सांगण्यासाठी 40 लाखांची सॅलरी देईल ‘ही’ कंपनी, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

नवी दिल्ली : स्कॉटलंडची एका बिस्किट कंपनी ‘बॉर्डर बिस्किट्स’ला आपल्यासाठी ‘मास्टर बिस्किटर’ चा शोध आहे. ‘इंडिपेन्डंट’ वेबसाइटच्या वृत्तानुसार कंपनी बिस्किट चाखण्याच्या बदल्यात 40 हजार पाउंड (सुमारे 40 लाख रुपये) चे वार्षिक पॅकेज देणार आहे.

इच्छुक अर्जदार चव आणि बिस्किट उत्पादनातील मोठी समज, नेतृत्व कौशल व संवाद कलेत पारंगत असण्याची आवश्यकता आहे. ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी खास उपाय सुचवणार्‍या अर्जदारांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे.

‘बॉर्डर बिस्किट्स’चे व्यवस्थापकीय संचालक पॉल पार्किंस यांनी म्हटले, ही कुणालाही आपले स्वप्न पूर्ण करण्याची ही एक अविश्वसनीय संधी आहे. तर, कंपनीची हेड ऑफ ब्रँड सूजी कारलॉ म्हणते, कंपनी ग्राहकांना सर्वश्रेष्ठ स्वाद आणि गुणवत्तेचे बिस्किट देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. आपल्या याच प्रतिबद्धतेचा अवलंब करण्यासाठी कंपनीला नव्या ‘मास्टर बिस्किटर’चा शोध आहे. या पदासाठी पाककलेचे चांगले ज्ञान असण्यासह लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्याचे कौशल्य असणे खुप आवश्यक आहे.

‘बॉर्डर बिस्किट्स’चे व्यवस्थापकीय संचालक पॉल पार्किंस यांनी म्हटले, आम्ही देशभरातील लोकांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत आणि काही उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यापूर्वी अशाच प्रकारची नोकरी 2019 मध्ये कॅडबरीने काढली होती. कंपनीला दुकानात येण्यापूर्वी उत्पादनाच्या नमुण्यांसाठी चार चॉकलेट टेस्टर्सची आवश्यकता होती. ‘बॉर्डर बिस्किट्स’ने काढलेली ही व्हॅकन्सी फुल टाइम असेल आणि वर्षात 35 दिवसांची सुट्टी सुद्धा मिळेल.