बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशनमध्ये 540 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशनने मल्टी स्किल वर्करमध्ये भरती प्रकिया राबवण्यात येणार आहे. बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशनने 540 जागांवरुन भरती प्रक्रिया राबवली आहे. यासाठी पात्र आणि इच्छूक उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठीची भरती प्रक्रिया bro.gov.in या वेबसाइटवर रावबण्यात आली आहे.

ही भरती बोर्ड रोड विंग्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेंसद्वारे जारी करण्यात आली आहे. ही पदे जनरल रिजर्व इंजिनिअर फोर्समध्ये रिक्त आहेत. या पदावर फक्त पुरुष उमेदवार अर्ज करु शकतात. मल्टी स्किल वर्करसाठी 540 जागा आहेत.

एकूण पदे – 560
जनरल – 221
एसी – 81
एसटी – 40
ओबीसी – 145
ईडब्ल्यूएस – 53

असा करा अर्ज –
जे उमेदवार अर्ज करु इच्छितात त्यांना बीआरओच्या bro.gov.in अधिकृत वेबसाइटवर अर्ज करु शकतात. लवकरच अर्ज करण्याची अंतिम तारीख वेबसाइटवर उमेदवारांना कळवण्यात येईल.

काय आहे Board Roads Organisation –
सध्या बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशनची अध्यक्षता संरक्षण राज्य मंत्री करतात. सीमा संपर्कला प्रोस्ताहन देण्यासाठी, बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशनला पूर्णता संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत देण्यात आले आहे.

Visit : Policenama.com