PM बोरिस जॉन्सन यांनी UK मध्ये 1 जून पर्यंत वाढवलं ‘लॉकडाऊन’, काही अटींसह सरकारनं दिली ‘शिथिलता’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – यूकेमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे आणि वाढत्या मृत्यूच्या संख्येमुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बोरिसने देशात लॉकडाऊन पुढे वाढवण्याबरोरबच नवीन रूपरेषा देखील तयार केली आहे.

यूकेच्या पंतप्रधानांनी रविवारी देशव्यापी लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला, तसेच सार्वजनिक जागा उघडण्यासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यासाठी अंतिम मुदत दिली. तथापि, बोरिस यांनी अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ते म्हणाले की जे लोक घरून काम करू शकतात त्यांनी ते केले पाहिजे पण ज्यांना बाहेर जाऊन काम करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही ते बाहेर जाऊन काम करू शकतात.

बोरिस यांनी लोकांना सांगितले की ते जवळच्या उद्यानात आणि घराबाहेर आपल्या कुटूंबियांसह व्यायाम करू शकतात, खेळू शकतात, त्यांच्या एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल ते त्यांच्या गाडीने जाऊ शकतात. तथापि, यावेळी प्रत्येकाला मास्क घालणे अनिवार्य असेल. जॉन्सनने स्पष्ट केले आहे की जर संक्रमणाची प्रकरणे वाढली तर निर्बंध वाढवले जातील. जॉन्सनने काही सवलतींसह मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

– आपण स्थानिक उद्यानात सूर्याखाली बसू शकता, दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता, खेळू शकता परंतु केवळ आपल्या कुटुंबातील सदस्यांसह.

– कामावर परतलेल्या लोकांनी सार्वजनिक वाहने थोड्या प्रमाणात वापरली पाहिजेत.

– देशात येणार्‍या व्यक्तीला त्वरित क्वारंटाईन होणे आवश्यक आहे.

– बायोसिक्युरिटी सेंटरद्वारे नवीन अ‍लर्ट सिस्टम स्थापित केली जाईल.

– 1 जूनपासून प्राथमिक शाळा सुरू करता येतील, पण परिस्थितीच्या आधारे निर्णय घेतला जाईल.

– 1 जुलै रोजी अधिक दुकाने आणि हॉटेल्स सुरू होतील.

यूके सध्या सर्वाधिक संक्रमणाच्या बाबतीत तिसर्‍या क्रमांकावर आहे, येथे दोन लाखाहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत आणि 31,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.