home page top 1

इंग्लंडचे PM जॉनसन यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना दाखवले ‘जोडे’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्रान्समध्ये होत असलेल्या जी-७ संमेलनात भाग घेण्यासाठी जगभरातील नेते मंडळी पॅरिसमध्ये पोहचलेली आहेत. ते एकमेकांना भेटत असताना ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्राॅन यांच्या भेटीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये बोरिस जॉनसन हे इमॅन्युएल मॅक्राॅन यांच्या समोरील टेबलावर पाय ठेवताना अशा पद्धतीचा एक व्हिडीओ जोरदार पद्धतीने व्हायरल होत आहे.

हे सगळं तेव्हा झालं जेव्हा दोघांची भेट झाली तेव्हा भेटीनंतर दोघांनी एलिसी कॅम्पसमध्ये मीडियाला संबोधित केले. त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्रपती ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांना घेऊन एका खोलीत गेले आणि दोघेही कॉफी टेबलावरती बसले.

दोघांची बातचीत सुरु असतानाच अचानकपणे जॉनसन यांनी आपले पाय टेबलावरती ठेवले हे पाहून फ्रान्सचे राष्ट्रपतीसुद्धा आश्चर्यात पडले. आपल्या अशा कारनाम्यांमुळेच बोरिस जॉनसन हे सतत चर्चेत असतात. लोक त्यांची तुलना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही करतात. बोरिस जॉनसन जेव्हा ब्रिटनचे प्रधानमंत्री झाले होते तेव्हाही ते खूप चर्चेत होते. पॅरिसमध्ये दोन देशांच्या प्रमुखांमध्ये झालेला हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like