Borivali Session Court | पत्नीची प्रतिष्ठा जपणे हे पतीचे कर्तव्य; मुंबईतील एका प्रकरणात न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – येथील एका प्रकरणात न्यायालयाने (Borivali Session Court) निकाल देताना म्हटले आहे की, पत्नीला तिच्या प्रतिष्ठेनुसार सन्मानाने जगता यावे आणि या दृष्टीने खबरदारी घेणे हे देखील पतीचे कर्तव्य आहे. तसेच पती आपल्या विभक्त राहत असलेल्या पत्नीला पोटगी देण्याची जबाबदारी झटकू शकत नाही. असा निर्वाळा एका प्रकरणावर निकाल देताना बोरीवली महानगर न्यायालयाने (Borivali Session Court) दिला आहे. तसेच या प्रकरणावर निकाल सुनावताना अर्जदार महिला व तिच्या मुलाला दरमहा ६०,५०० रूपयांची पोटगी देखील न्यायालयाने मंजुर केली आहे.

या प्रकरणात अर्जदार महिला आणि तिच्या पतीची लाईफस्टाईल विचारात घेत कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली न्यायालयाने (Borivali Session Court) पोटगीची रक्कम निश्चित केली आहे. गोरेगाव येथील एका महिलेने पती शारिरीक तसेच मानसिक छळ करत असल्याचा दावा करत कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली तिच्या पतीविरोधात खटला दाखल केला होता. अर्जदार महिलेला तिच्या पतीपासून एक मुलगा देखील आहे. त्यामुळे मुलाचे शिक्षण, विभक्त राहण्यासाठी घराचे भाडे यासाठी दर महिन्याला पतीने १ लाख २४ हजारांची पोटगी द्यावी अशी मागणी अर्जदार महिलेने आपल्या अर्जात केली होती.

सदर महिलेच्या अर्जाची महानगर दंडाधिकारी आर जी बगाडे यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यांनी या खटल्यात आपले निरीक्षण नोंदविले आहे. यात ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीचे आर्थिक उत्पन्न पुरेसं असताना ती व्यक्ती जर आर्थिक गरजा भागवू शकत नसलेल्या पत्नीकडे दुर्लक्ष करत असेल तर संबंधित महिला फौजदारी दंड संहितेच्या कलम १२५ अन्वये पोटगीची हकदार बनते. तसेच अशा वेळी पतीला पत्नीस पोटगी देणे बंधनकारक असते. असे मत त्यांनी आपल्या निरीक्षणात नोंदविले आहे. (Borivali Session Court)

सदर महिलेने केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचेही मत त्यांनी यावेळी
नोंदविले आहे. यानंतर त्यांनी या प्रकरणात अर्जदार महिला आणि मुलाचा देखभाल खर्च तसेच घरभाडे
आणि मुलाच्या शिक्षणावरील खर्च यासाठी दर महिन्याला ६०,५०० रूपये देण्याचे निर्देश त्यांनी अर्जदार पत्नीच्या
पतीला दिले आहेत. त्यासोबतच पत्नीने दावा केलेल्या मालमत्तेवरील हक्काचा निर्णय मात्र न्यायालयाने
(Borivali Session Court) राखून ठेवला आहे.

Web Title :- Borivali Session Court | court says that it is husbands responsibility to save status of wife